ऑनलाइन टास्कच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत

 


पिंपरी : ऑनलाइन टास्कच्या नावाखाली पिंपरी चिंचवडमधील एका व्यक्तीला ३२ लाख ९२ हजार ५६३ रुपयांचा गंडा घालणार्‍या एका ठकसेनाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने मिरा भाईंदरमधून अटक करण्यात यश मिळविले आहे.

जैईद जाकीर खान वय २० वर्षे, व्यवसाय - शिक्षण रा. फ्लॅट नं १०२, सारुपी कावेरी हौ.सो. नयानगर. मिरा भाईदर असे या आरोपीचे नाव आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यक्तीशी आरोपीने व्हॉट्सअ‍ॅपवरून संपर्क साधला. त्याला फावल्यावेळात ऑनलाईन टास्क केल्यास चांगले पैसे मिळतील असे आमिष दाखवले. सुरुवातीस मोबदला मिळत गेल्याने त्या व्यक्तीचा यावर विश्वास बसला. त्यानंतर आरोपीने त्याव्यक्तीस बिटकॉइन, युएसडीटीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले पैसे मिळतील असे सांगितले. आरोपीवर विश्वास बसला असल्याने त्याव्यक्तीने आरोपीने सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या खात्यांवर पैसे भरले.मात्र, नंतर पैसे मिळणे बंद झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने पोलिसात तकार नोंदविली.

या प्रकरणी सांगवी पोलीसठाण्यात ०८/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम  ४१९, ४२० आय. टी. अॅक्ट ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल होता. क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा असल्याने पोलीसायुक्तांनी सायबर शाखेला याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. सायबर शाखेने चिकाटीने तपास करून आरोपीचा ठावठिकाणा शोधला. त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या व्यक्तीने  ज्या खात्यात पैसे भरले त्याची माहिती घेतली असता त्यात १८ लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याचे पोलिसांना समजले आहे. आरोपीविरोधात अन्य राज्यात २ तक्रारी दाखल आहेत. तसेच त्याने अन्य काहीजणांना बँकखाती काढून दिली आहेत.त्यामुळे हे मोठे रॅकेट असावे असा पोलिसांना संशय आहे. अधिक तपास सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर  आयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे,  शिपाई अतुल लोखंडे, कृष्णा गवळी, यांनी केली/

  

ऑनलाइन टास्कच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत ऑनलाइन टास्कच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत Reviewed by ANN news network on ५/१४/२०२४ ०८:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".