पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात वाहनचोरी करणार्या तीन सराईत वाहनचोरांना अटक करण्यात पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाला यश आले आहे. या त्रिकुटाकडून पोलिसांनी १४ मोटारसायकली जप्त केल्याअसून त्यांची कंमत अंदाजे ६ लाख ६५ हजार रुपये आहे. या तिघांच्या अटकेमुळे १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
शुभम अशोकराव लोंढे (वय-21), सचिन समाधान दळवी (वय-23 दोघे रा. खंडोबा मंदीराजवळ, आळंदी), शिवाजी भोसले (रा. आळंदी देवाची) अशी या तिघांची नावे आहेत.
आळंदी बस स्टॉप येथे दोघे चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिस पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी ही मोटारसायकल चोरीची असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने हालचाल करीत त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला ताब्यात घेतले.
या आरोपींकडून पोलिसांनी 14 दुचाकी जप्त केल्या आहेत.यामुळे आळंदी, वाळुंज (छत्रपती संभाजीनगर), महाळुंगे, लोणी काळभोर, शिक्रापूर, संगमनेर, आळेफाटा, चिखली पोलीस ठाण्यातील एकंदर 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, उपनिरीक्षक भरत गोसावी, अंमलदार महेश खांडे, राहुल खारगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, प्रविण कांबळे, सागर शेडगे, प्रविण माने, गणेश कोकणे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, अमर कदम व समीर रासकर यांनी केली.
 Reviewed by ANN news network
        on 
        
५/१४/२०२४ ०८:४४:०० PM
 
        Rating:
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
५/१४/२०२४ ०८:४४:०० PM
 
        Rating: 

 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: