पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आज २० मे रोजी भाजप प्रणित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांना निवेदन देऊन शहरातील वाढती पबसंस्कृती आणि अनाचाराला आवर घालावा असे निवेदन दिले.
पुण्यातील कल्याणीनगर ते विमानतळ रस्त्यावर १८ मे रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका बड्या बिल्डरच्या मुलाने दारूच्या नशेत पोर्श कार बेभानपणे चालवून मोटारसायकलवरून जाणार्या तरूण तरूणीला चिरडले.त्या अनुषंगाने मोहोळ यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि पबसंस्कृतीला आवर घालण्याची मागणी केली.
यावेळी मुरलीधर मोहोळ, हर्षदा फरांदे, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, राजेश येनपुरे, योगेश टिळेकर, गणेश बिडकर, संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे, सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, प्रदीप देशमुख, लतीफ शेख, रूपाली पाटील, , हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, राहुल भंडारे व इतर महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कालच्या अपघाता संदर्भात पोलिसांनी काय काय कारवाई केली आहे याची सविस्तर माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पुण्यामधील वाढत्या पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी आवश्यकता सर्व कठोर उपाय योजना करण्यात येतील असे आश्वासन पोलीस आयुक्त यांनी उपस्थित शिष्टमंडळाला केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: