भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'यमन रंग' या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार,दि.२५ मे २०२४ रोजी करण्यात आले आहे.'बिल्वकल्प' प्रस्तुत या कार्यक्रमात यमन रागावर आधारित मराठी हिंदी गीतांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात येणार असून
पारंपरिक बंदिशी ,सरगम गीत ,तराणे सादर केली जाणार आहेत. सौ.बिल्वा द्रविड ,पुष्कर गाडगीळ हे गायन सादर करणार आहेत . डॉ.नरेंद्र चिपळूणकर(हार्मोनियम),रोहित जाधव(तबला ),अवधूत धायगुडे (साइड रिदम ) हे साथसंगत करणार असून सौ. सुधा राजगुरू या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवार, दि.२५ मे २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०९ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
२५ मे रोजी'यमन रंग' कार्यक्रम
Reviewed by ANN news network
on
५/२०/२०२४ ०३:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: