लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरामध्ये १३५१ उमेदवार रिंगणात

 


नवी दिल्‍ली : लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1351 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मध्यप्रदेशातील निवडणूक स्थगित करण्यात आलेल्या 29-बैतुल  (एसटी) या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या 8 उमेदवारांचा देखील समावेश आहे. तसेच गुजरातमधील सुरत मतदार संघातून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. या सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी 22 एप्रिल 2024 पर्यंतची मुदत होती.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी या 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 95 लोकसभा मतदारसंघांतून (29-बेतुलसह) एकूण 2963 उमेदवारी अर्ज भरण्यात आले.या सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत 19 एप्रिल 2024 रोजी संपली. दाखल झालेल्या  सर्व अर्जांच्या छाननीनंतर 1563 अर्ज वैध ठरले

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी गुजरातमधील 26 लोकसभा मतदारसंघांतून सर्वाधिक 658 उमेदवारी अर्ज सादर झाले. त्याखालोखाल महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांतून 519 उमेदवारी अर्ज सादर झाले. महाराष्ट्रामध्ये 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राज्यातील सर्वाधिक 77 उमेदवारी अर्ज दाखल  झाले तर त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 5-विलासपूर लोकसभा मतदारसंघात 68 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूकीचा राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय तपशील असा आहे.

राज्य/ केंद्रशासित प्रदेश

लोकसभा मतदारसंघांची संख्या

आलेले अर्ज

छाननीत वैध ठरलेले अर्ज

अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर रिंगणात असलेले उमेदवार

आसाम

4

126

52

47

बिहार

5

141

54

54

छत्तिसगड

7

319

187

168

दादरा, नगर हवेली, दमण दिव

2

28

13

12

गोवा

2

33

16

16

गुजराथ

26

658

328

266

जम्मू काश्मीर

1

28

21

20

कर्नाटक

14

503

272

227

मध्यप्रदेश

9

236

140

127

महाराष्ट्र

11

519

317

258

उत्तरप्रदेश

10

271

104

100

पश्चिम बंगाल

4

101

59

57

एकूण

95

2963

1563

1352

 


लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरामध्ये १३५१ उमेदवार रिंगणात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरामध्ये १३५१ उमेदवार रिंगणात Reviewed by ANN news network on ४/२४/२०२४ १२:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".