पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात २३ एप्रिल रोजी
रात्री साडेदहाच्या सुमारास एका कारमधून २७ लाख रुपये रोख रक्कम पकडण्यात आली आहे.
२३ एप्रिल रोजी रात्री निवडणूक यंत्रणेच्या पथकांनी पोलिसांना सोबत
घेत हिंजवडी पुलाखाली नाकाबंदी केली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबईकडून
येणा-या एका कारला थांबवून पथकाने झडती
घेतली असता कारमध्ये २७ लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. कारमधील व्यक्तीने आपण
व्यावसायिक असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र सापडलेल्या रकमेबाबत समाधानकारक
स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे ही रक्कम आणि कार दोन्ही जप्त करण्यात आले
आहेत. आयकर विभाग आणि पोलीस या प्रकाराची अधिक चौकशी करत आहेत.
कारमधून २७ लाख रुपये जप्त
Reviewed by ANN news network
on
४/२४/२०२४ ११:४२:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/२४/२०२४ ११:४२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: