संविधान ८० वेळा बदलणाऱ्या काँग्रेसचा भाजपा विरोधात अपप्रचार : विनोद तावडे

 


मुंबई : गोव्यातल्या काँग्रेस उमेदवाराने गोव्यात भारतीय संविधान लागू करू नयेअशी मागणी केली आहेतर कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने अशीच मागणी काही दिवसा पूर्वी केली होती. यावरून काँग्रेसलाच संविधानाविषयी आदर नसल्याचे स्पष्ट झाले आहेअशी टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येमाध्यम विभाग प्रमुख नवनाथ बनभाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष डॉ.संजय पाण्डेयप्रवक्ते अतुल शाह यावेळी उपस्थित होते. काँग्रेस ने सत्ताकाळात संविधानात 80 वेळा बदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्यावर टीका करण्यासारखे काहीच उरले नसल्याने काँग्रेस नेते राहुल गांधीमल्लिकार्जुन खर्गे हे संविधान बदलासाठी भाजपाला 400 पेक्षा अधिक जागा हव्या आहेतअसा अपप्रचार करत आहेतअसा हल्ला श्री.तावडे यांनी चढवला . 

            मोदी सरकारच्या कार्यकाळात संविधान दिवस साजरा केला जाऊ लागलाभाजपाचे संकल्पपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी प्रसिद्ध झाले. यावरून भारतीय जनता पार्टीचा डॉ.आंबेडकर आणि संविधानाबद्दलचा आदर स्पष्ट झाला आहे असेही श्री.तावडे यांनी सांगितले.

श्री.तावडे म्हणाले की, गोव्यातील काँग्रेस उमेदवाराने गोवा राज्याला भारतीय संविधान लागु करू नये अशी मागणी जाहीरपणे केली आहे. राहुल गांधी यांच्या अनुमतीनेच आपण ही मागणी करत आहोत असे या उमेदवाराने सांगितले आहे. कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने असेच वक्तव्य केले होतेयावरून काँग्रेसला संविधानाचा आदर करण्याची इच्छा नाही हेच स्पष्ट झाले आहे

यावेळी श्री.तावडे यांनी राज्यातील प्रचाराच्या घसरलेल्या पातळी बाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले कीप्रमोद महाजनगोपीनाथ मुंडेबाळासाहेब ठाकरेविलासराव देशमुखशरद पवार हे नेतेही परस्परांवर टीका करत असत. मात्र त्यावेळी प्रचाराची पातळी घसरत नव्हती.

मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला भरभरून मिळाले आहेअसे स्पष्ट करत श्री.तावडे यांनी गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राला केंद्राकडून काय मिळाले याचा हिशोब सादर केला. ते म्हणाले की युपीए’ सरकारच्या तुलनेत केंद्राकडून महाराष्ट्राला मिळालेल्या अनुदानात 253 टक्क्यांनी वाढ झालीकरांच्या परताव्यापोटी मिळणाऱ्या रकमेत 33 टक्के वाढ झाली. 2020-2021 पासून 11 हजार 711 कोटी एवढे बिनव्याजी कर्ज मिळालेराज्यात शहरी आणि ग्रामीण भागात 27 लाख घरे पंतप्रधान आवास योजनेखाली बांधली गेली. अशा अनेक गोष्टींचा विचार करून मतदार भाजपा आणि महायुतीला भरभरून मतदान करतील असा विश्वास श्री.तावडे यांनी व्यक्त केला.

श्री.तावडे म्हणाले कीमहाराष्ट्रात आयुष्मान भारत योजनेचे 2.50 कोटी लाभार्थी आहेतराज्यात जनधन योजनेत 3 कोटी 42 लाख खाती उघडली गेली. मुद्रा योजनेत महाराष्ट्रात 2 लाख 33 हजार कोटी एवढे कर्ज वाटप झालेराज्यात 8 लाख विक्रेत्यांना स्वनिधी योजनेत कर्ज मिळाले. 75 लाख जणांच्या घरात जलजीवन योजनेद्वारे पाणी मिळाले.

संविधान ८० वेळा बदलणाऱ्या काँग्रेसचा भाजपा विरोधात अपप्रचार : विनोद तावडे संविधान ८० वेळा बदलणाऱ्या काँग्रेसचा भाजपा विरोधात अपप्रचार : विनोद तावडे Reviewed by ANN news network on ४/२३/२०२४ ०९:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".