सोयगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून वीजचोरी, महावितरणचे दुर्लक्ष..

 



दिलीप शिंदे 

सोयगाव:  सोयगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून आकडा टाकून वीजचोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार दि.१६ मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला होता. तीन दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील महावितरणच्या कर्मचारी वा अधिकाऱयांनी कारवाई केली नसल्याने  महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे महावितरण कंपनीचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. एरवी सर्वसामान्य नागरिकांनी आकडे टाकून वीजचोरी केल्यास त्यांच्यावर महावितरण कडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर महावितरण कडून  कारवाई केली जात नसल्याने शहरात चर्चेचा  विषय ठरला आहे.

 याबाबत सविस्तर माहिती अशी, ग्रामीण रुग्णालयाच्या समोर सोयगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची नूतन वास्तू उभारण्यात आली आहे. संबंधित वास्तूचे बांधकाम बाबत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सिल्लोडचे उपअभियंता अशोक शाकावर यांच्याशी संपर्क साधला असता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची इमारत आमच्याकडे नसून ती सार्वजनिक बांधकाम उपविभाग फरदापुर यांच्याकडे असल्याचे सांगितले.सार्वजनिक बांधकाम उपविभाग फरदापुरचे उपअभियंता अजय टाकसाळ यांना या इमारतीच्या बांधकामा विषयी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले सदरील इमारतीचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत झाले आहे. लाखो रुपये खर्च करून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून शासनाच्या कोणत्या यंत्रणेने हे काम केले आहे त्या अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची इमारत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करणार कोण हे न उलगडणारे कोडे बनले आहे. मात्र तालुका आरोग्य विभाग या इमारतीचा मार्च महिन्यापासून वापर करीत आहे. आकडा टाकून कार्यालयात वीजपुरवठा सुरू आहे. दि.१५ एप्रिल रोजी  सोयगाव येथील महावितरण कार्यालयाकडे वीज जोडणीचा अर्ज तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिला आहे. मात्र महावितरण कार्यालयाकडून विद्युतमीटर बसविण्यात आलेले नाही त्यामुळे आकडा टाकून वीजचोरी होत आहे. यावर महावितरण काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.




विद्युत महावितरण ला विद्युत मिटर साठी अर्ज दाखल केला असुन विद्युत महावितरण कडून आकडा टाकण्याची तात्पुरती परवानगी दिली आहे. 
                              - डॉ. गितेश चावडा,  तालुका आरोग्य अधिकारी. 


विद्युत महावितरण विभाग आकडा टाकण्याची कुठलीही परवानगी देत नाही. त्यामुळे आकडा टाकण्याची तात्पुरती परवानगी देण्याचा विषयच नाही. 
                                
                                  - निरज बिदे ,उपकार्यकारी अभियंता विद्युत महावितरण सोयगाव
सोयगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून वीजचोरी, महावितरणचे दुर्लक्ष.. सोयगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून वीजचोरी, महावितरणचे दुर्लक्ष.. Reviewed by ANN news network on ४/१९/२०२४ १२:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".