महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष..
दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव-जरंडी रस्त्यावरून धावत्या टिप्पर व ट्रॅक्टर मधून अवैधरित्या गौनखनिजाची सर्रास वाहतूक केली जात आहे.सुट्टीच्या दिवशी गौनखनिज वाहतुक जास्त प्रमाणात केली जात असल्याने जास्तीच्या फेऱ्याहोऊन उत्पन्न वाढावे यासाठी टिप्पर व ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने टिप्पर व ट्रॅक्टर घेऊन जात असतांना मुरूमाचे खडे व वाळू रस्त्यावर पडत आहे. चारचाकी वाहनांच्या चाकांमुळे मुरूम व वाळू रस्त्यावर सर्वत्र पसरत आहे. रस्त्यावर पसरलेल्या मुरुम व वाळूमुळे दुचाकी वाहने घसरून अपघात झालेले आहे तर काहींना याच ठिकाणी जीव गमवावा लागलेला आहे. मुरुम व वाळूमुळे पुन्हा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही.
शासकीय नियम धाब्यावर बसवून टिप्पर व ट्रॅक्टर मधून वाळू व मुरूमाची वाहतूक केली जात आहे.वाहतूकदार वाळू व मुरूम वाहतूक करतांना कोणतीही काळजी घेत नाहीत. वाहन पकडली जाऊ नये यासाठी वेगाची मर्यादा ठेवत नाही.त्यामुळे वेगाने जाणाऱ्या टिप्पर व ट्रॅक्टर मधून वाळू व मुरूम रस्त्यावर पडत जातो.पुढे चारचाकी वाहनांमुळे रस्त्यावर सर्वत्र पसरतो.मुरूम व वाळू मुळे दुचाकी वाहनांच्या चाकांची रस्त्यावरील पकड सैल होते आणि दुचाकी वाहने घसरतात. दुचाकी वाहने घसरून अपघात होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.सोयगाव-चाळीसगाव हा मार्ग तालुक्यातील नागरिकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे मार्गावर चोवीस तास जड व हलक्या वाहनांची वर्दळ असते.दुचाकींची या मार्गावर जास्त रेलचेल असते. दरम्यान भरधाव वेगाने गौनखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाची वक्रदृष्टी केंव्हा पडेल याची मात्र चर्चा तालुक्यात रंगली आहे.
तालुक्यात अवैधरित्या गौणखनिजाची सर्रास वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने गौनखनिज माफियांकडून शासनाच्या महसुलावर डल्ला मारला जात आहे.तत्कालीन तहसीलदार यांच्या कार्यकाळात सुरू असलेला अवैधरित्या गौनखनिज वाहतूकीचा सारीपाट नुकताच सोयगाव तहसिल कार्यालय तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारलेल्या विद्यमान तहसीलदार यांच्या कार्यकाळ सुरूच आहे. शासनाचा नियम धाब्यावर बसवून तहसिल कार्यालयाच्या समोरूनच अवैधरित्या गौनखनिज वाहतूक सुरू असते. गौनखनिज माफियांना राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांचे आशिर्वाद असल्याने महसुलच्या एकाही अधिकऱ्यात वाहने थांबवून कारवाईची धमक नसल्याने तहसिल अधिकाऱ्यांच्या बाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.दरम्यान विद्यमान तहसीलदार व पोलीस प्रशासन अवैधरीत्या गौनखनिज वाहतुकीवर कारवाई करून नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतात का ? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
धावत्या टिप्पर व ट्रॅक्टर मधून रस्त्यावर पडणाऱ्या मुरूम व वाळूमुळे दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात..
Reviewed by ANN news network
on
४/१९/२०२४ १२:००:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/१९/२०२४ १२:००:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: