विजेच्या तारांचा एकमेकाला स्पर्श होऊन पडलेल्या ठीणगीमुळे मका,चारा व ठिबक संच जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान...
दिलीप शिंदे
सोयगाव : विजेच्या तारांचा एकमेकाला स्पर्श होऊन पडलेल्या ठिणगी मुळे सोगणी करून ठेवलेला चार एकरातील मका,चारा व ठिबक संच जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील घोरकुंड शिवारात दि.१८ गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील शेतकरी श्रीमती आशाबाई अशोक गायकवाड यांची गट.न. ७१ मध्ये पाच एकर जमीन असुन त्यामध्ये मका पिकाची लागवड करण्यात आली होती सद्या मका सोगणी करुन ठेवलेला होता शेतातुन विजवाहीनेचे तार गेलेले असुन सकाळी तारांचा एकमेकाला स्पर्श झाल्याने ठीणगी पडली व मका पिकास आग लागली आग पसरत गेल्याने सर्व शेतात आग पसरली.शेतकरी शेतात येत असताना त्यांना आग लागल्याचे दिसले त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील गजानन साठे,जितेंद्र शिंदे, गोविंद शिंदे ,संकेत साबळे, संदीप साबळे, शरीफ तडवी ,काशिनाथ पठाडे, दादा शिंग गोराडे,उत्तम आगडे,मंगेश शिंदे, रमेश तायडे, मदतीस धावुन आल्याने आग विजवण्यात यश आले. तोपर्यंत चार एकरातील मका, ठिबक संच व जनावरांचा चारा जळुन खाक झाला असुन जवळपास शेतकऱ्याचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान ह्या वर्षी पावसाळा कमी झाल्याने खरीप हंगामात अत्यंत कमी उत्पादन आल्याने शेतीसाठी लागलेला खर्च देखील निघाला नसल्याने शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला असुन विहीरीना कमी प्रमाणात पाणी असल्याने रब्बी हंगामात मका पिकाची लागवड केली त्या मका पिकास पाणी कमी पडल्याने पर्यायी दुसऱ्या शेतकऱ्याकडुन पाणी घेऊन मका पिक जमविले त्या पिकाची सोगणी करुन ठेवलेला मका काही क्षणात कोळसा झाल्याने शेतकरी चे मोठे नुकसान झाले याबाबत तलाठी यांनी पंचनामा केला असून पुढील अहवाल सोयगाव तहसिलला पाठविण्यात आला आहे. शासनाने शेतकऱ्यास तात्काळ मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
पंचनामा करताना तलाठी
विजेच्या तारांचा एकमेकाला स्पर्श होऊन पडलेल्या ठीणगीमुळे मका,चारा व ठिबक संच जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान...
Reviewed by ANN news network
on
४/१९/२०२४ १२:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: