तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचा : कल्याण काळे
दिलीप शिंदे
सोयगाव : जालना लोकसभा निवडणुकीत बदल घडवायचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहचून महाविकास आघाडीचे मतदान वाढवावे असा निर्णय रविवारी( दि.२१) सायंकाळी पाच वाजता सोयगावात महाविकास आघाडीच्या नियोजन बैठकीत झाला. त्यानुसार महाविकास आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब करा असे आवाहन उमेदवार कल्याण काळे यांनी केले आहे.
सोयगावात रविवारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची प्रचार नियोजन बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) जेष्ठनेते रंगनाथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी शिवसेना(उद्धव ठाकरे गट) जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड,रंगनाथ काळे यांनी मार्गदर्शन केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची मतदारांना जाणीव करून द्यावी कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य हे एकमेव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब असल्याचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याचे नेते शरद पवार यांनी केलेल्या कार्यामुळे शेतकरी जगला आहे असेही काळे यांनी सांगितले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू काळे, शहराध्यक्ष दिनेशसिंग हजारी शिवसेना(उद्धव ठाकरे गट) तालुका प्रमुख दिलीप मचे, शहराध्यक्ष रवींद्र काटोले, विठ्ठल बदर, रघुनाथ चव्हाण उपजिल्हाप्रमुख (उबाठा), तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. इंद्रजित सोळंके ,उपशहरप्रमुख दीपक बागुल (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवी काळे,आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.इंद्रजित सोळंके यांनी केले. राजू काळे यांनी आभार मानले.
मंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व असलेल्या सोयगावात महाविकास आघाडीने घट्ट मूठ आवळली आहे त्यामुळे सोयगावात लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम होणार आहे मंत्री अब्दुल सत्तार यांना महाविकास आघाडीने सोयगावात आव्हान उभे केले आहे
महाविकास आघाडीची सोयगावात वज्रमूठ
Reviewed by ANN news network
on
४/२१/२०२४ ०८:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: