पुणे : पुणे जिल्ह्यातील, वेल्हा तालुक्यात असलेल्या वरसगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला २७ मार्च रोजी पुण्यातील कर्वेनगर येथे ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
विठ्ठल वामन घाडगे (वय ४४) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात एका व्यक्तीने तक्रार दिली होती. तकारदाराचे मौजे वरसगांव ता. वेल्हे, जि. पुणे येथे वडीलोपार्जीत मिळकत घर क्र. २५ व घर नं. २६ आहे. या मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदी दुरुस्त करुन, मिळकत घर नं. २५ च्या ८ अ उता-यावर तक्रारदार यांचे आईचे व मिळकत घर नं. २६ च्या ८ अ उता-यावर तक्रारदार यांचे स्वतःचे नाव दुरुस्त करुन संगणीकृत ८ अ चा उतारा देण्यासाठी विठ्ठल घाडगे याने ५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने त्याची तक्रार अॅन्टीकरप्शन खात्याच्या कार्यालयाकडे केली. अधिकार्यांनी सापळा लावला. आणि, पुण्यातील कर्वेनगर येथे असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमाच्यासमोर, विठ्ठल मंदिर भाजी मंडई नजिक त्याला लाच स्वीकारताना 'रंगेहाथ' पकडले.
पुढील तपास निरीक्षक विद्युलता चव्हाण तपास करीत आहेत. ही कारवाई अधीक्षक अमोल तांबे,अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: