पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
तिरुपती-साईनगर शिर्डी-तिरुपती साप्ताहिक विशेष (26 ट्रिप )
ट्रेन क्रमांक 07637 तिरुपती-साईनगर शिर्डी साप्ताहिक स्पेशल, जी 31.03.2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता 07.04.2024 ते 30.06.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (13 ट्रिप )
गाडी क्रमांक 07638 साईनगर शिर्डी-तिरुपती साप्ताहिक विशेष, जी 01.04.2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता 08.04.2024ते 01.07.2024पर्यंत वाढवण्यात आली आहे. (13 ट्रिप )
अजमेर-सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष (26 ट्रिप )
गाडी क्रमांक 09627 अजमेर-सोलापूर साप्ताहिक स्पेशल, जी 27.03.2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता 03.04.2024 ते 26.06.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (13 ट्रिप )
गाडी क्रमांक 09628 सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष, जी 28.03.2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता 04.04.2024 ते 27.06.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (13 ट्रिप )
बिकानेर-साईनगर शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष (26ट्रिप )
गाडी क्रमांक 04715 बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष, जी 30.03.2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता 06.04.2024ते 29.06.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (13 ट्रिप )
ट्रेन क्रमांक 04716साईनगर शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष, जी 31.03.2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता 07.04.2024 ते 30.06.2024पर्यंत वाढवण्यात आली आहे. (13ट्रिप )
इंदूर-पुणे-इंदूर साप्ताहिक विशेष (18 ट्रिप )
ट्रेन क्रमांक 09324 इंदूर-पुणे साप्ताहिक स्पेशल, जी 24.04.2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता 01.05.2024 ते 26.06.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (9 ट्रिप)
गाडी क्रमांक 09323 पुणे-इंदूर साप्ताहिक विशेष, जी 25.04.2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता 02.05.2024 ते 27.06.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (9 ट्रिप)
वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळेत, रचनेत आणि थांब्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आरक्षण: वरील विशेष ट्रेन क्रमांक- 07638, 09628, 07416 आणि 09323 च्या विस्तारित प्रवासासाठी विशेष शुल्कावर बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर आधीच सुरू आहे.
विशेष गाड्यांच्या तपशीलवार थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: