६२ लाख २४ हजार रुपयांचे दागिने हस्तगत; २२ गुन्ह्यांची झाली उकल
भिवंडी : विमानाने महाराष्ट्रात येऊन घरफ़ोडी करून पुन्हा आसाम, नागालँड
भागात जाऊन दडी मारणा-या एका सराईत घरफ़ोड्याला भिवंडी पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या
कर्मचा-यांनी आसाममध्ये जाऊन बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे. त्याच्याकडून ६२ लाख
२४ हजार रुपयांचे दागिने ८८९ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
यामुले २२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. यासाठी पोलीसपथकाला तब्बल ५ दिवस आसाममध्ये वेशांतर
करून मोटारसायकलवर फ़िरावे लागले.
मोईनुल अब्दुल मलीक इस्लाम, रा. सामरोली गांव, चौधरी बाजार, ता. जि. होजाई, आसाम असे या चोरट्याचे नाव आहे. तो पूर्वी नवीमुंबईमध्ये रहात होता.
तेथे त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
नारपोली पोलीस स्टेशन, भिवंडी येथे ७६०/२०२३ या क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ४५४, ३८० अन्वये
दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास गुन्हेशाखेचे पोलीस करत होते.
त्यावेळी हा गुन्हा आरोपीने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो केवळ
घरफ़ोडी करण्यासाठी विमानाने आसाममधून येतो आणि पुन्हा आसाम, नागालँडमध्ये निघून
जातो हे देखील पोलिसांना समजले. आरोपी मोबाईल वापरत नसल्याने आणि आपली ओळख
लपविण्यासाठी केसांचा विग वापरत असल्याने त्याला अटक करणे हे पोलिसांसमोर आव्हान
होते.
रमजान महिना असल्याने आरोपी आपक्या मूळगावी घरी आला असल्याची माहिती
पोलिसांना मिळाली. सहायक निरीक्षक धनराज केदार, हवालदार अमोल देसाई, शिपाई भावेश घरत हे तातडीने आसाममध्ये आरोपीच्या
गावी गेले. तिथे पाच दिवस वेशांतर करून मोटारसायकलवर फ़िरत त्यांनी आरोपीचा
ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर मुराजर पोलीस स्टेशन, ता. जि. होजाई, आसाम यांच्या मदतीने
आरोपीला ताब्यात घेतले.
विमानाने प्रवास करून तो घरफ़ोडी करण्यासाठी यायचा शहरात!; पोलिसांनी आवळल्या मुसक्या!!
Reviewed by ANN news network
on
४/१३/२०२४ ०८:००:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: