मुंबई : मुंबई महापालिकेच्या चंदनवाडी, मरीन लाईन्स परिसरातील सी वार्ड कार्यालयात इमारत व कारखाने विभागात काम करणारे दोन अभियंते आणि एक खासगी व्यक्ती असे तिघेजण ८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात सापडले आहेत.
मंगेश चंद्रकांत कांबळी, ३७ वर्षे, कनिष्ठ अभियंता, सूरज शिवाजीराव पवार, ४३ वर्षे, दुय्यम अभियंता, दोन्ही नेमणूक- इमारत व कारखाने विभाग, सी वार्ड, मनपा, चंदनवाडी, मरीन लाईन्स, मुंबई - ४०० ००२ आणि निलेश जयंती होडार, ३७ वर्षे, धंदा- समाजसेवा, राहणार. ३/६८, नाखुदा चाळ, चंदनवाडी, मरीन लाईन्स, मुंबई ४००००२ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी अॅन्टीकरप्शनच्या
वरळी येथील कार्यालयात एका व्यक्तीने तक्रार दिली होती. या व्यक्तीच्या भागीदारीत
असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील पोटमाळ्याच्या अनधिकृत बांधकामाला
निष्कासनाची नोटीस देण्यात आली होती. त्यासंदर्भात तक्रारदार मंगेश कांबळी आणि
सूरज पवार यांना भेटण्यासाठी गेला असता त्यांनी पोटमाळ्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी १५ लाख आणि टेरेसवर
उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर कारवाई न करण्यासाठी ५ लाख अशी एकूण २० लाख रुपयांची
लाच मागितली. तक्रारदाराने याबद्दल तक्रार दिल्याने अॅन्टीकरप्शनच्या पथकाने ५
एप्रिल रोजी सापळा रचला. यासाठी ८ लाख रुपयांच्या ख-य़ा आणि बाकीच्या खोट्या नोटा
तयार ठेवून मंगेश कांबळी आणि सूरज पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लाच
स्वीकारण्यासाठी निलेश होडार याला पाठविले. त्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई अॅन्टीकरप्शन विभागाचे अपर आयुक्त विजय पाटील, अपर उपायुक्त राजेंद्र सांगळे, भागवत सोनावणे यांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त नितीन दळवी यांनी दिली.
मुंबई महापालिकेचे दोन अभियंते अॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात
Reviewed by ANN news network
on
४/१३/२०२४ ०८:००:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: