अॅन्टॉपहिल : अॅन्टॉपहिल पोलीसठाण्याच्या हद्दीत ६ एप्रिल रोजी पहाटे एका तरुणावर गोळ्या झाडून पसार झालेल्या आणि अन्य दोघांचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक करण्यात यश मिळविले आहे. यामुळे दोन खुनाचे संभाव्य गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
विवेक देवराज चेट्टीयार, वय २६ वर्षे, रा. टि. वडाळा असे पकडण्यात आलेल्या
आरोपीचे नाव आहे. हा आरोपी दाखलेबाज गुन्हेगार असून त्याला कोविड काळात तुरुंगातून
अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते, मात्र, त्यानंतर तो पुन्हा तुरुंगात हजर झाला
नाही. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे १२ गंभीर गुन्हे
दाखल आहेत.
६ एप्रिल रोजी
पहाटेच्या सुमारास अॅन्टॉपहिल, मुंबई परिसरातील नवतरुण नाईक नगरामध्ये एका तरुणावर गोळीबार झाला होता. या
प्रकरणी अॅन्टॉपहिल पोलीसठाण्यात १८६ / २०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३०७, १२०(ब) हत्यार
कायदा कलम ३, २५, २७ हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस
कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल असून याचा समांतर तपास
गुन्हेशाखेमार्फ़त चालू होता. पोलिसांनी अथक प्रयत्न करून हा आरोपी डोंबिवली
परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळविली. ९ एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीनुसार
गुन्हेशाखेच्या पोलिसांचे पथक डोंबवली परिसरातील कोळेगांव, कटई नाका येथे दबा धरून थांबले. पहाटेच्यासुमारास
आरोपी तेथे आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता
त्याच्यापाठीवर असलेल्या सॅक बॅगमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल व सहा जिवंत राऊंड व एक रिकामी पुंगळी आढळली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता,
त्याने अॅन्टॉपहिल येथे तरुणावर गोळीबार केल्याची कबुली दिली. तसेच, अन्य दोन
व्यक्तींना ठार मारण्याच्या प्रयत्नास असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.
त्याला वेळीच अटक करण्यात आल्यामुळे त्या दोन व्यक्तींवरील प्राणघातक हल्ले टळले
आहेत.
एकावर खुनी हल्ला करून अन्य दोघांचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत गुन्हेगारास अटक
Reviewed by ANN news network
on
४/१३/२०२४ ०८:००:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: