शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक फ़सवणूक करणारे मध्यप्रदेशातील तीन भामटे अटकेत!

 


उज्जेन आणि इंदूर येथील कॉलसेंटर उध्वस्त!!; माटुंगा पोलिसांची कामगिरी!!!

मुंबई : माटुंगा पोलीसठाण्याच्या पथकाने उज्जैन आणि इंदूर येथे कॉलसेंटर उभारून त्याद्वारे देशभरातील अनेक नागरिकांना शेअरट्रेडिंग मधून भरपूर फ़ायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांचा गंडा घालणा-या मध्यप्रदेशातील त्रिकुटाला अटक करून अवैध कॉलसेंटर उध्वस्त करण्यात यश मिळविले आहे.

राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर माटुंगा पोलिसांनी घेतलेल्या माहितीवरून देशभरातील ३९ तक्रारींशी या ठकसेनांचा संबंध असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे.

राजबहादुर रामसिंग भदोरीया, वय ६२ वर्ष, रा. ठि. घर नं. ११८, सैनिक कॉलनी, गोले का मंदीर, ग्वालियर, मध्यप्रदेश, अंकित उर्फ राजकुमार श्रीराम शिंदे, वय ३० वर्ष, रा. अंजनी नगर, क्रिष्णा मिल्क सेंटरजवळ, इंदोर, मध्यप्रदेश.  संजय भगवानदास बैरागी, वय २८ वर्ष, रा. गांव - करंज, तहसिल - तराणा, जि. उजैन, मध्यप्रदेश अशी आरोपींची नावे आहेत.

चंद्रशेखर आनंदराव तावरे, वय ५६ वर्ष, माटुंगा पूर्व, मुंबई यांनी माटुंगा पोलीसठाण्यात फेब्रुवारी २०२४ मध्ये शेअरमार्केटमध्ये भरपूर नफ़ा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९६८५१३०७६५ क्रमांकाच्या मोबाईलधारकाने आपली फ़सवणूक केल्याची तक्रार दिली होती. त्यावरून माटुंगा पोलीस ठाण्यात १७२/२४ क्रमांकाने  भारतीय दंडविधान कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ सह माहिती तंत्रद्न्यान कायदा कलम ६६ , ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सहायक निरीक्षक दिगंबर पगार त्यांच्या सायबर पथकाने करून यातील एक आरोपी राजबहादुर रामसिंग भदोरीया याला मुंबई विमानतळावरून अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी ०४ डेबिट कार्ड क्रेडीट कार्ड, ०४ विवध बँक खात्यांची चेकबुक, ०३ मोबाईल, ०५ सिमकार्ड जप्त करण्यात आली होती. तो या फ़सवणुकीच्या उद्योगातून खात्यात जमा झालेले पैसे काडून उज्जैन आणि इंदूर येथे पाठवत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी विजयनगरम इंदूर येथून अन्य दोन आरोपी अंकित उर्फ राजकुमार शिंदे आणि संजय बैरागी यांना अटक केली. या आरोपींनी देशभरातील नागरिकांची फ़सवणूक करण्यासाठी उज्जैन आणि इंदूर येथे चक्क कॉलसेंटरच उभारल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी तेथे छापे घालून तेथून १६ मोबाईल, १५ सिमकार्ड,  ०१ लॅपटॉप, ,राउटर, , ०३ लाख पेक्षा अधिक लोकांचा मोबाईल क्रमांकांचा डाटा असा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी   पोलीस आयुक्त  विवेक फणसळकर, विशेष आयुक्त  देवेन भारती, सहआयुक्त, ( कायदा सुव्यवस्था)   सत्यनारायण,   अपर आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, अनिल पारसकर, उपआयुक्त परिमंडळ - ०४ प्रशांत कदम,   सहाय्यक  आयुक्त, माटुंगा विभाग  संजय जगताप, वरिष्ठ निरीक्षक, माटुंगा पोलीस ठाणे दिपक चव्हाण, निरीक्षक संजय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर अधिकारी सहायक पोलीस दिगंबर पगार, हवालदार संतोष पवार, मंगेश जऱ्हाड,  निकम,  शिपाई साळुंखे  यांनी केली.


शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक फ़सवणूक करणारे मध्यप्रदेशातील तीन भामटे अटकेत! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक फ़सवणूक करणारे मध्यप्रदेशातील तीन भामटे अटकेत! Reviewed by ANN news network on ४/१३/२०२४ ०८:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".