पिंपरी : पिंपरी चिंचवडसह पुण्यातील काही ठिकाणी संघटित गुन्हेगारी करणार्या आदर्श जगताप याच्यासह त्याच्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्का कायद्याखाली कारवाई केली आहे.
टोळीप्रमुख आदर्श ऊर्फ कुक्या गोविंद जगताप (वय २२), सुनील राणोजी जावळे (२६, दोघेही रा. आदर्श नगर, मोशी), रोहित ऊर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे (१९, रा. भोसरी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या टोळीवर भोसरी, दिघी, वाकड, फरासखाना पोलीसठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, अशा स्वरुपाचे १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे, निरीक्षक अनिल देवडे, अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांनी केली.
जगताप टोळीवर 'मोक्का' कारवाई
Reviewed by ANN news network
on
४/०३/२०२४ ०८:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: