नवी मुंबई : ठाणे ग्रामीण पोलीसदलातील निरीक्षक आणि त्याच्या पाच साथीदारांनी एका व्यापार्याची कार रस्त्यात अडवून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून २ कोटी रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणी त्या व्यापार्याने तक्रार दाखल केल्यानंतर हा पोलीस निरीक्षक आणि त्याच्या पाच साथीदारांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे ग्रामीण पोलीसदलातील निरीक्षक नितीन विजयकर, मोहन पाडळे, उदय कवळे, विलास मोहिते, नारायण सावंत आणि मोहन पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राजेश काटरा असे ज्याच्याकडून खंडणी उकळण्यात आली त्या व्यापार्याचे नाव आहे.
काटरा विद्याविहार पाईपलाईन रोडवर राहतात. त्यांचे तुर्भे एमआयडीसीमध्ये कोल्ड स्टोअरेज आहे. ते दुपारी नवी मुंबईच्या दिशेने निघाले असता आरोपींनी त्यांची कार सायन पनवेल मार्गावरील वाशी उड्डाणपुलाकडून पामबिचवर जाण्यासाठी सर्व्हीसरोडवर आली. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडविले. तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात काळापैसा आहे. याबाबत अनेक तक्रारी आहेत. तुम्ही आणि तुमचे कुटुंब यात अडकू शकते. हे घडायला नको असेल तर दोन कोटी रुपये द्या अशी मागणी आरोपींनी केली.
कटरा यामुळे घाबरले.त्यांनी आरोपींना सेक्टर २९ मधील आपल्या नातेवाईकांच्या घरी नेले. तेथे त्यांना दोन कोटी रुपये दिले. त्यानंतर त्यांनी वाशी पोलिसात तक्रार दिली.पोलिसांनी सोमवारीआरोपींना अटक केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: