विनातिकिट प्रवास करणार्यांकडून वसूल केलेल्या दंडामुळे रेल्वेच्या पुणे विभागाला २ कोटी १४ लाखांची कमाई
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फेब्रुवारी २०२४ मध्ये महिन्यात विना तिकीट प्रवासी, अनियमित प्रवास करणारे आणि सामान बुक न करता तसेच घेऊन जाणार्यांकडून दंड वसूल करून तब्बल २ कोटी १४ लाख रुपयांची कमाई केली आहे.
पुणे रेल्वे विभागात फेब्रुवारी २०२४ मध्ये तिकीट तपासणी दरम्यान २६ हजार ३७४ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी १४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ८ हजार ५४६ प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ५१ लाख ६७ हजार रुपये दंड करण्यात आला. सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २३३ प्रवाशांकडून ३४ हजार २० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वेच्या अधिकार्यांनी केले आहे.
Reviewed by ANN news network
on
४/०३/२०२४ ०९:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: