पुणे : पुणे शहरातील येरवडा भागात १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास यशवंतनगर येथे एका तरुणाने एका महिलेच्या घरासमोर विवस्त्र होऊन अश्लील अंगविक्षेप करत धिंगाणा घातल्याने त्याच्यआहे.भारतीय दंडविधान कलम ३५४, ३५४ (अ) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
धनराज महेश थोरात (वय २६ रा. यशवंतनगर, येरवडा) असे या तरुणाचे नाव आहे.त्याच्याविरोधात ज्या महिलेच्या घरासमोर त्याने हे वर्तन केले तिने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तिच्या नणंदेबरोबर गप्पा मारत दारात उभी असताना आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत आपल्या अंगावरचे सर्व कपडे काढून टाकले. आणि अश्लील अंगविक्षेप करण्यास सुरुवात केली. यामुळे फिर्यादीच्या मनास स्त्रीसुलभ लज्जा उत्पन्न झाली. तिने दुसर्या दिवशी पोलिसात तक्रार नोंदविली. आरोपीने यापूर्वीही पाठलाग करून विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Reviewed by ANN news network
on
४/०३/२०२४ ०९:०२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: