पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात २०-०४-२०२४ रोजी १० व्यक्तींनी २२ अर्ज नेले आहेत. तर आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. आजवर ४९ व्यक्तींनी ९२ अर्ज आजवर नेले आहेत.
आज श्रीरंग चंदू बारणे (थेरगाव, शिवसेना), सुहास मनोहर राणे (लोणावळा,अपक्ष), शेखर पांडुरंग चंदनशिवे (पिंपरी , राष्ट्रवादी युवक कॉग्रेस), ॲड.राजू पाटील (वाकड , अपक्ष), ॲड.पूजा कलाटे (वाकड , अपक्ष), विजय निवृत्ती वाघमारे (वाकड, बहुजन समाज पार्टी), सागर तुकाराम जगताप (पिंपळे सौदागर, बहुजन समाज पार्टी), भाऊ रामचंद्र अडागळे (निगडी, महाराष्ट्र मजुर पक्ष), किशोर वसंत साळवे (गणेश नगर, अपक्ष), उत्तम संभाजी कांबळे (पिंपरी, अपक्ष) तसेच शिवाजी किसन जाधव (थेरगाव, भारत राष्ट्र समिती) यांनी देखील नामनिर्देशन पत्र नेले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: