पिंपरी : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली नजिक २१ एप्रिल रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून सोलापूरकडे लग्नाचे वर्हाड घेऊन जाणार्या एका बसला आग लागली. या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
हा प्रकार शॉर्टसर्किटमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. बसमध्ये ४२ प्रवासी होते. सर्व सुखरूप आहेत.या घटनेमुळे काही काळ वाहतूककोंडी झाली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महामार्ग पोलीस, समाजसेवी संस्था, डेल्टा फोर्स यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
द्रुतगतीमार्गावर बस जळून खाक
Reviewed by ANN news network
on
४/२१/२०२४ १०:५९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: