मशाल निशाणी घराघरात पोहोचवा : मनोहर भोईर

 


उरण :  उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक हा कडवट आणी निष्ठावंत आहे. ठाकरे कुटुंबावार प्रचंड प्रेम करणारा आहे. त्याला गद्दारी अजिबात आवडत नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहण्यासाठी आपले उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचे आहे. त्यासाठी घरा घरात आपली मशाल निशाणी पोहोचवाअसे आवाहन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले.

 

मावळ लोकसभेचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघातील उरणपनवेल आणि खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकरपनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटीलखालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळेराजिप सदस्य मोतीराम ठोंबरेउपतालुकाप्रमुखविभागप्रमुखउपविभागप्रमुखमहिला आघाडीच्या पदाधिकारीयुवासेना पदाधिकारी आदी मान्यवर आणी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मनोहर भोईर पुढे म्हणाले कीमावळ लोकसभा मतदारसंघासाठी पक्षप्रुख उध्दव ठाकरे साहेबांनी आपल्याला विनम्रशब्दाला जागणारे अशी ओळख असलेले उमेदवार दिलेले आहेत. त्यांना उरण विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द आपल्या सर्वाच्या वतीने मी पक्षप्रमुखांना दिला आहे. त्यासाठी प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकापर्यंत मशाल पोहोचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

 

 

"येत्या 13 मेपर्यंत गाफील राहू नका"

गावोगावी महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारआम आदमी पार्टीसमाजवादी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचारात सोबत घ्या. सर्वांनी आपण स्वतः उमेदवार आहोत,  असा विचार करून प्रचारात कुठेही मागे न राहू नका. येत्या 13 मेपर्यंत कोणीही गाफील राहायचे नाहीअसेही मनोहर भोईर यांनी सांगितले.

मशाल निशाणी घराघरात पोहोचवा : मनोहर भोईर मशाल निशाणी घराघरात पोहोचवा :  मनोहर भोईर Reviewed by ANN news network on ४/२०/२०२४ ०९:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".