'ईद मिलन ' मधून सर्वधर्मियांची स्नेहभेट !

 


आझम कॅम्पसच्या भारतीय संगीत मैफिलीला प्रतिसाद

पुणे :हलक्या पावसाने हवेत आलेला गारवा,कार्यक्रमस्थळी करण्यात आलेला अत्तराचा दरवळ,सर्वधर्मीय, सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती - स्नेह भेटी आणि भारतीय संगीताची मधूर पेशकश यामुळे आझम कॅम्पस आयोजित ईद मिलन कार्यक्रम संस्मरणीय ठरला !

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी,अवामी महाझ सामाजिक संघटना यांच्यातर्फे शनिवारी सायंकाळी ७ वाजता आझम कॅम्पस, (पुणे कँप) येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. नुकत्याच झालेल्या  रमझान महिन्याच्या उपवासाची समाप्ती, ईद -उल -फित्र (रमझान ईद) च्या निमित्ताने उपस्थितांनी  शुभेच्छाची देवाण घेवाण केली.या उपक्रमाचे हे २५ वे वर्ष होते. 

या ईद मिलन कार्यक्रमात 'यशलक्ष्मी आर्ट्स' च्या कलाकारांनी भारतीय संगीत मैफिलीत सुरेल रंग भरले. त्यात हिंदी चित्रपटातील शास्त्रीय संगीतावर,रागदारीवरील आधारित गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.राधिका अत्रे, महेश देशमुख यांनी बहारदार गीते सादर केली.आकाश सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले. 

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ.पी.ए .इनामदार,आबेदा इनामदार,एस.ए.इनामदार,प्रा.इरफान शेख,शाहिद शेख,अफझल खान,साबीर शेख, मश्कूर शेख,वहाब शेख,वाहिद बियाबानी यांनी सर्वांचे स्वागत केले. आझम कॅम्पस परिवारातील सर्व संस्था,अवामि महाज सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,सामाजिक,शैक्षणीक,सहकार,राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.माजी पोलीस अधिकारी अशोक धिवरे,माजी आमदार मोहन जोशी,माजी मंत्री रमेश बागवे,कमल व्यवहारे,माजी आमदार दीप्ती चौधरी,वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार वसंत मोरे,शिवसेनेचे संजय मोरे,माजी नगरसेवक गफूर पठाण,एमआयएमचे लोकसभा उमेदवार अनिस सुंडके,मुनव्वर कुरेशी,रशीद शेख,रफिक शेख,नीता परदेशी,इक्बाल अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.


'ईद मिलन ' मधून सर्वधर्मियांची स्नेहभेट ! 'ईद मिलन ' मधून सर्वधर्मियांची स्नेहभेट ! Reviewed by ANN news network on ४/२१/२०२४ ११:०२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".