पुणे : श्रीमती प्रियांका शर्मा यांनी दिनांक 03.4.2024 पासून पुणे विभागाच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (रेल्वे सुरक्षा दल) या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्या उत्तर रेल्वे दिल्ली येथे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त-I या पदावर कार्यरत होत्या. त्यांची नियुक्ती विभागीय सुरक्षा आयुक्त श्री ज्योती मणी यांच्या जागी करण्यात आली आहे. रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी ही माहिती दिली.
श्रीमती प्रियांका शर्मा या भारतीय रेल्वे सुरक्षा दल सेवेच्या 2012 तुकडीच्या अधिकारी आहेत. त्यांनी सार्वजनिक प्रशासन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
श्रीमती शर्मा यांना भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा विभागात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी बिकानेर विभागातून सहाय्यक सुरक्षा आयुक्त म्हणून आपली सेवा सुरू केली आणि उत्तर रेल्वे - मुख्यालय येथे सुरक्षा आयुक्त, दिल्ली विभागात सुरक्षा आयुक्त - II, रेल्वे बोर्ड - नवी दिल्ली येथे अतिरिक्त महानिरीक्षक (एआयजी), दयाबस्ती येथे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि उत्तर रेल्वे –दिल्ली येथे वरिष्ठ सुरक्षा कमांडंट – I इत्यादी पदांवर काम केले आहे.
रेल्वेच्या पुणे विभाग वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तपदी प्रियांका शर्मा
Reviewed by ANN news network
on
४/०५/२०२४ ०९:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: