मोठ्या प्रमाणात गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन जप्त

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा विभागाने गावठी दारू तयार केली जात असलेल्या एका ठिकाणी छापा घालून मोठ्या प्रमाणात गावठी दारूनिर्मितीसाठी लागणारे रसायन, गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन जप्त केले आहे. या जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ कोटी ६ लाख ९५ हजार आहे. 

या प्रकरणी लोणीकंद पोलीसठाण्यात ४००/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३२८,३४, महाराष्ट्र प्रोहीबिशन कायदा कलम ६५ (ख) (च) (ड) अन्वये तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव शिंदे, ता. हवेली, जि. पुणे येथील गट क्र. ४२१ मध्ये मोठ्याप्रमाणात गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा घातला. त्यावेळी तेथे जमिनीखाली ७ टाक्यांमध्ये दारूनिर्मितीसाठी लागणारे रसायन, तयार गावठी दारू आणि गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य त्यांना दिसून आले. जमिनीखालील टाक्यांमध्ये असलेल्या या २ लाख १० हजार लिटर रसायनाची किंमत १ कोटी ५ लाख असून तेथे १ हजार ५०० लिटर तयार गावठी दारू आढळली. या दारुची किंमत १ लाख ८० हजार आहे. या खेरीज १५ हजार रुपये किमतीचे दारूनिर्मितीसाठी लागणारे साहित्यही जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या पैकी रसायन नष्ट करण्यात आले.

ही कामगिरी  श्री. अमोल झेंडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे,राजेश माळेगावे,सहायक फौजदार राजेंद्र कुमावत, अंमलदार बाबा कर्पे,अजय राणे,तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, ओंकार कुंभार, इरफान पठाण, इम्रान नदाफ,अमेय रसाळ,सागर केकाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, अविनाश कोंडे या पथकाने केली.


मोठ्या प्रमाणात गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन जप्त  मोठ्या प्रमाणात गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन जप्त Reviewed by ANN news network on ४/२६/२०२४ १०:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".