विविध बँकांचे चेक आणि डेबिट कार्ड जप्त
पिंपरी : बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिली.
जुनैद मुक्तार कुरेशी, सलमान मन्सूर शेख, अब्दुल अजीज अन्सारी, अकिफ अन्वर आरिफ अन्वर खान आणि तोफीक गफ्फार शेख अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 7 लाख रुपये रोख, 7 मोबाईल फोन, 1 कॅश काऊंटिंग मशिन, विविध बँकांची 8 डेबिट कार्ड, विविध बँकांची 12 चेकबुक आणि पंजाब नॅशनल बँकेचे 1 पासबुक जप्त केले आहे.
या आरोपींनी सुमारे 120 बँक खात्यांच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: