औद्योगिक परिसरात चो-या करणारी टोळी अटकेत!

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखलीतील औद्योगिक परिसरात चोया करणा-या एका टोळीच्या मुसक्या आवळण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे.

आलम युनूस मणियार वय ३३ वर्षे, मूळ रा. ग्राम ईश्वरदासपुर, पो. उचहा, एनटीपीच्या बाजूला, ता. जि. रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश,  जुबेर अब्दुलवहाब मेमन वय २७ वर्षे, मूळ रा. ग्राम याकुबपुरा, ता. जि. हैद्राबाद, राज्य आंध्रप्रदेश, दिपक कपीलदेव तिवारी वय २२ वर्षे, रा. मूळ रा. ग्राम मनकापुर, ता. तुलसीपुर, जि. बलरामपुर, राज्य उत्तरप्रदेश अशी अटक करण्यात आलेल्ल्यांची नावे असून ते सध्या गायकवाडनगर, जी.के. रोझ सोसायटीसमोर भंगार दुकानामध्ये, पुनावळे पुणे येथे रहात होते. अफझल युसूफ मणियार आणि छोटू ऊर्फ शामलाल यादव हे दोन आरोपीही पोलिसांना हवे आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

गणेशनगर, चिखली परिसरातील प्रवीण इंडस्ट्रीज कंपनीमधुन अज्ञात चोरटयांनी १लाख ७५ हजार ५०० रुपये किंमतीचा गाडयांचे सुट्टे पार्ट तयार करण्याकरीता लागणारा लोखंडी  कच्चा माल चोरून नेला होता. ५ एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर कंपनी मालक प्रवीण राजेंद्र भुजबळ, वय ३४ वर्षे, रा. सेक्टर १८, प्लॉट नं. ४१८, पोलाईट हाईटस जवळ, शिवतेजनगर, चिखली प्राधिकरण, पुणे यांनी चिखली पोलीसठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून चिखली पोलीस ठाण्यात २०१/२०२४ क्रमांकाने  भारतीय दंडविधान कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल होता. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे करत होते. त्यांनी यासंदर्भात त्या परिसरातील सीसीटीव्ही फ़ुटेज तपासली असता ५ एप्रिल रोजी रात्री २ वाजून १० मिनिटांनी एक मोटारसायकल आणि एक टेम्पो त्या परिसरात आल्याचे दिसले. या टेम्पोवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी कॊल करून चौकशी केली असता तो टेम्पो मूळ मालकाने विकला असल्याचे पोलिसांना समकले. पोलिसांनी दुसया मालकाचा तपास केला. त्याला विचारले असता त्याने हा टेम्पो आरोपी अफ़झल मणियार याला दिल्याचे सांगितले. पोलिसांनी पुनवळे परिसरात जाऊन अफ़झल याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून अन्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसीखाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, पोलिसांनी या टोळीकडून १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो जप्त केला आहे.

ही कामगिरी  पोलीस उपआयुक्त परिमंडळ -  शिवाजी पवार सहा.पोलीस आयुक्त, भोसरी विभाग संदीप हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ  निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन ज्ञानेश्वर काटकर, सहायक निरीक्षक  उध्दव खाडे,  हवालदार सुनिल शिंदे, बाबा गर्जे, चेतन सावंत, भास्कर तारळकरसंदिप मासाळ, दिपक मोहिते, अमोल साकोरे, नाईक अमर कांबळे, कबीर पिंजारी, संदीप राठोड,  शिपाईए संतोष सकपाळ, संतोष भोर, सातपुते यांनी केली.


औद्योगिक परिसरात चो-या करणारी टोळी अटकेत! औद्योगिक परिसरात चो-या करणारी टोळी अटकेत! Reviewed by ANN news network on ४/१०/२०२४ १०:०८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".