गरीबांची उपेक्षा करणाऱ्या इंडी आघाडीला पापाची शिक्षा द्या!; रामटेकमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन



रामटेक : घराणेशाहीच्या राजकारणातून देशावर सत्ता गाजविणाऱ्या इंडी आघाडीने देशातील गरीबांचीदलितांचीवंचितांची सतत उपेक्षा केली असून गरीबांना राज्य करण्याचा हक्क नाकारल्यामुळेच काँग्रेस आणि इंडी आघाडीचे नेते मोदीविरोधात उभे ठाकले आहेतअसा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामटेक येथील जाहीर सभेत बोलताना चढविला.नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,रामटेक चे उमेदवार राजू पारवे आणि भंडारा-गोंदिया चे उमेदवार खा. सुनील मेंढे  यांच्या प्रचारार्थ झालेल्या या विराट सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ  नेते खा. प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. या सभेत पंतप्रधानांनी काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या राजकारणाची अक्षरशः चिरफाड केली.देशातील समाजात फूट पाडण्यासाठी इंडी आघाडीचे निकराचे प्रयत्न सुरू असून संघटितपणे त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रालोआला मतदान कराअसे आवाहन त्यांनी केले. जनता संघटित झाली तर इंडी आघाडीचे राजकारणच संपून जाईल अशी त्यांना भीती आहेपण त्या आघाडीला ताकद मिळाली तर देशाचे तुकडे तुकडे होतीलअसा इशाराही मोदी यांनी दिला. आता त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. म्हणूनच त्यांनी आता मोदींना लक्ष्य केले आहे. घराणेशाहीची मक्तेदारी संपुष्टात आणून गरीबाघरचा मुलगा सत्तेवर आलाहे त्यांना सहन होत नसल्यामुळेच मोदींवर वैयक्तिक हल्ले सुरू झाले आहेत.असे असले तरी मी देशसेवेच्या माझ्या संकल्पापासून मागे हटणार नाहीअशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.



आजकाल टीव्हीमिडियावाले वेगवेगळ्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करून एनडीएच्या प्रचंड विजयाचे अंदाज वर्तवित आहेत. पण त्यासाठी त्यांना एवढा खर्च करण्याची गरजच नाही. जेव्हा मोदींच्या नावाने लाखोली सुरू होतेतेव्हा मोदींचा विजय निश्चित आहेहे समजून घ्या. जेव्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्हे सुरू होताततेव्हा मोदी सत्तेवर येणार हे स्पष्ट असतेअशा शब्दांत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडविली. मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर लोकशाही संपुष्टात येईलअशी अफवा अलीकडे इंडी आघाडीवाले पसरवत आहेत. मी सत्तेवर आलो तेव्हापासून ते हीच भाषा बोलत आहेत. हीच त्यांची बौद्धिक दिवाळखोरी असून त्यांच्याकडे नवे मुद्देच नाहीतनव्या कल्पनाच नाहीतअशी खरमरीत टीकाही मोदी यांनी केली. आणीबाणीच्या काळात सरकारवर एका परिवाराचा कब्जा होतातेव्हा लोकशाही संकटात नव्हती काएक गरीबाचा पुत्र सत्तेवर आलातेव्हाच यांना अचानक लोकशाही संकटात आल्याचा साक्षात्कार कसा होतोअसा सवाल त्यांनी केला. गरीबाने देशाचे नेतृत्व करावे ही कल्पनाच इंडी आघाडीला सहन होत नाहीम्हणूनच मोदींवर वैयक्तिक हल्ले होत आहेतपण कितीही हल्ले झाले तरी देशसेवेच्या संकल्पापासून हा मोदी मागे हटणार नाहीअसा निर्धारही पंतप्रधानांनी बोलून दाखविला.


इंडी आघाडीवाले पूर्ण ताकद पणाला लावून देशाच्या जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणूनचएकजूट होऊन देशासाठी मतदान करा. भारतीय संस्कृतीला दूषणे देण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. यावेळी रामनवमीला अयोध्येत रामलल्ला तंबूत नाहीतर भव्य मंदिरात दर्शन देणार आहेत. पाचशे वर्षांनंतर हा सुवर्णयोग आला आहे. पूर्ण देश एका अदभुत अनुभूतीचा आनंद घेत आहेपण जेव्हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आलातेव्हा इंडी आघाडीने निमंत्रण नाकारून सोहळ्यावर बहिष्कार घातला. ते सनातन संपविण्याची भाषा करतात. हिंदू धर्माच्या शक्तीला संपविण्याची यांची भूमिका असते. अशा इंडी आघाडीला महाराष्ट्रात एकाही जागेवर विजय मिळू देऊ नका. या निवडणुकीत त्यांना नाकारून त्यांच्या सनातनविरोधी मानसिकतेला शिक्षा द्याअसे आवाहनही त्यांनी केले. तुमचे एक एक मत भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनेला विजयी करणार आहेचपण इंडी आघाडीला शिक्षा देण्यासाठी देखील महत्वाचे आहे. काँग्रेसने गरीबांचीमहिलांचीदलितांची उपेक्षा केली. बाबासाहेब आंबेडकरांना भाजपा चा पाठिंबा असलेल्या सरकारने भारतरत्न किताबाने गौरविले. आदिवासी समाजातील महिलेला एनडीएने राष्ट्रपती बनविले. एनडीए सरकारने पहिल्यांदाच ओबीसींना मंत्रिमंडळात सर्वाधिक प्रतिनिधित्व दिले. मेडिकल शिक्षणात ओबीसींना आरक्षणस्वतंत्र आदिवासी मंत्रालयदहा वर्षांत आदिवासी कल्याणासाठीचे बजेट पाचपट वाढले. एनडीए सरकारमुळेच मागासवर्गीय समाजघटकांतील युवकांच्या शैक्षणिक संधी वाढल्या. ‘सब का साथ सब का विकास’ हा मंत्र हीच संविधानाची प्रामाणिक भावना आहेपण परिवारवादी पक्षांनी नेहमीच या भावनेचा अपमान केलाआणि सामाजिक न्यायाची भाषा करत आपल्या परिवारांचे कल्याण करून घेतले. गरीबांना सुविधांपासून वंचित ठेवले. या गरीबांना सुविधा देण्याचे काम एका गरीब मातेच्या पुत्रानेमोदीने केले आहेअसे ते म्हणाले.


शतप्रतिशत विकासाची गॅरंटी हाच खरा सामाजिक न्याय असतो. कारण यात भेदभावाची शक्यता नसतेप्रत्येक लाभार्थीला त्याच्या हक्काचा लाभ मिळून भ्रष्टाचाराची दुकाने बंद होतात. पक्के घरमोफत रेशनमोफत इलाजटॉयलेटवीज पाणी ,गॅस कनेक्शनची गॅरंटीमुळे असंख्य परिवारांना विकासाच्या नव्या आशेचे किरण दिसू लागले आहेत. यामुळेच 25  कोटी जनता गरीबीतून बाहेर आली.  काँग्रेसने एक देशएक संविधान लागू करण्यात अडथळे आणले.  70-75 वर्षे बाबासाहेबांचे संविधान संपूर्ण देशात लागू नव्हतेयाला जबाबदार कोणअसा सवाल करूनकन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत संविधान लागू करण्याचे काम मोदींनी केलेअसे ते म्हणालेतेव्हा पुन्हा मोदीविजयाच्या घोषणा गरजल्या. बाबासाहेबांचा आत्मा जिथे कोठे असेलतेथून काश्मीरमध्ये 370  हटविल्याबद्दल धन्यवाद देत असेलपण 370 हटवून देशाला काय मिळणार ही काँग्रेसी भूमिका म्हणजेकाँग्रेसच्या गरीबआदिवासी आणि व्होट बँकेच्या राजनीतीचा जिवंत पुरावा आहेअसा आरोपही त्यांनी केला. 370 कलम हटविल्यामुळे जम्मू काश्मीरातील जनतेला सर्व संविधानिक लाभ मिळाले आहेत. दलितमहिलागरीबांना नागरिकत्वाचे सारे हक्क प्राप्त झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे ही जनता वंचित होती. बाबासाहेबांनी दिलेले अधिकार जम्मू काश्मीरच्या लोकांना नव्हते.


सीएए’ला विरोध करून दलितवंचितांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा काँग्रेसचा कट आहे. इंडी आघाडी म्हणजे विरासत आणि विकासाचे विरोधक आहेत. गोसीखुर्द योजनेला काँग्रेसने कित्येक दशके रोखून ठेवले. पण राज्यातील महायुती सरकारमुळे या कामास वेग आलाआणि लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. हर घर नल से जल ही मोदी सरकारची गॅरंटी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार कठोर परिश्रम करत आहे. महाराष्ट्रात पीएम स्वनिधी योजनेतून हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. येत्या पाच वर्षांत संपूर्ण आत्मनिर्भरता हाच आमचा संकल्प आहेअशी ग्वाही देखील त्यांनी दिली.आज नागपूरच्याविदर्भाच्या विकासाला अभूतपूर्व वेग आला आहे. पर्यटनाला चालना मिळणार आहे. समृद्धी महामार्गामुळे पूर्ण क्षेत्राचा कायापालट झाला आहे. असा मजबूत विकास केवळ एनडीए सरकारच करू शकते. गेल्या दहा वर्षांतील विकास हा तर ट्रेलर आहे. अजून खऱा विकास पुढेच आहे.  येत्या पाच वर्षांत देशालामहाराष्ट्राला आणखी पुढे न्यायचे आहे. तुमचे स्वप्न हा मोदीचा संकल्प आहे. ‘हर पल देशके नामहर पल आपके नाम’ अशी ग्वाहीदेखील मोदी यांनी जनतेस दिली. 19 एप्रिलला रामटेकमधून राजू पारवेभंडारा - गोंदियातून सुनील मेंढे व नागपूरातून नितीन गडकरी यांना जास्तीत जास्त मतदान करून ऐतिहासिक विजय मिळवून द्याअसे आवाहन पंतप्रधानांनी केले


आशीर्वाद हीच ऊर्जा...

तुमच्याकडे माझे वैयक्तिक काम आहे. जेव्हा तुम्ही प्रचारासाठी घरोघरी जाणारतेव्हा नक्की सर्वांना सांगामोदीजी रामटेकला आले होतेआणि त्यांनी तुम्हाला रामराम सांगितला आहे. मातावयोवृद्धांकडून मिळणारा आशीर्वाद मला नवी उर्जा देईल आणि तुमच्यासाठी अपार काम करण्याची ताकद मला मिळेल.”अशा भावनिकतेने मोदी यांनी उपस्थितांना केलेल्या आवाहनानंतर प्रचंड गर्दीने जोरदार घोषणा देत त्यांना प्रतिसाद दिला. त्याआधीभाषणाच्या प्रारंभी मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत जनसमुदायाने आपल्या मोबाईलचे फ्लॅश उजळून रोषणाई करत अगोदरच विजयाची ग्वाही दिली.

गरीबांची उपेक्षा करणाऱ्या इंडी आघाडीला पापाची शिक्षा द्या!; रामटेकमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन गरीबांची उपेक्षा करणाऱ्या इंडी आघाडीला पापाची शिक्षा द्या!; रामटेकमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन Reviewed by ANN news network on ४/१०/२०२४ १०:१४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".