पुणे ते दानापूर आणि गोरखपूर उन्हाळी विशेष गाड्या



पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे ते दानापूर आणि गोरखपूर या मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांबाबत अधिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.


  1 पुणे-दानापूर-पुणे


 गाडी क्रमांक 01013 पुणे-दानापूर उन्हाळी विशेष गाडी दिनांक 27.04.2024 रोजी पुण्याहून 19.55 वाजता सुटेल आणि दानापूरला तिसऱ्या दिवशी 04.30 वाजता पोहोचेल.

 गाडी क्रमांक 01014 दानापूर-पुणे उन्हाळी विशेष दिनांक 29.4.2024 रोजी दानापूर येथून सकाळी 06.30  आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 17.35 वाजता पोहोचेल.

 थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

 रचना : एक फर्स्ट एसी + एक फर्स्ट कम टू टियर एसी + 6 एसी-3 टियर + 8 स्लीपर + 6 सामान्य द्वितीय श्रेणी+ दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन = एकूण 24 आयसीएफ कोच.


 2 पुणे-गोरखपूर-पुणे


 गाडी क्रमांक 01411 पुणे-गोरखपूर उन्हाळी विशेष दिनांक 27.4.2024 रोजी पुण्याहून 06.30 वाजता सुटेल.  आणि गोरखपूरला दुसऱ्या दिवशी 14.50 वाजता  पोहोचेल.

 गाडी क्रमांक 01412 गोरखपूर-पुणे  उन्हाळी विशेष   दिनांक 28.4.2024 रोजी गोरखपूरहून 18.20 वाजता सुटेल आणि पुण्याला तिसऱ्या दिवशी 06.40 वाजता पोहोचेल.

 थांबे: हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती.

 संरचना: 13 AC-3 टियर + एक स्लीपर + 4 सामान्य द्वितीय श्रेणी + एक गार्डची ब्रेक व्हॅन + एक जनरेटर कार = 20 LHB कोच.

 आरक्षण: गाडी  क्रमांक 01013, 01411 चे बुकिंग दिनांक  26.4.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.

 विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि या गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.

पुणे ते दानापूर आणि गोरखपूर उन्हाळी विशेष गाड्या पुणे ते दानापूर आणि गोरखपूर उन्हाळी विशेष गाड्या Reviewed by ANN news network on ४/२५/२०२४ ०२:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".