दीड लाख रुपयांची लाच मागणार्‍या अव्वल कारकुनावर गुन्हा दाखल



पुणे : सातबाराच्या उतार्‍यावर असलेली'पोकळीस्त' नोंद कमी करण्यासाठी पक्षकाराकाडून दीडलाख रुपयांची लाच मागणार्‍या हवेली तहसीलदार कचेरीतील अव्वल कारकुनावर पुण्यातील खडक पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नरेंद्र भानुदास ढोले, वय ४०,अव्वल कारकून, तहसिलदार कार्यालय, हवेली, पुणे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

 या प्रकरणी एका ४७ वर्षांच्या व्यक्तीने अ‍ॅन्टीकरप्शन खात्याच्या पुणे कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराची पश्चिम रिंग रोडसाठी संपादित केली जाणार आहे. त्या मोबदल्यात त्याला सरकारकडून ३४ लाख २० हजार ३४८ रुपये मिळणार आहेत. त्यापूर्वी या जमिनीच्या सातबारावरील 'पोकळीस्त' नोंद कमी करणे आवश्यक असल्याने तक्रारदाराने तसा अर्ज दिला होता. हे काम करण्यासाठी आरोपी ढोले याने तहसीलदारांकरिता दीड लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने अ‍ॅन्टीकरप्शनच्या पुणे कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर अ‍ॅन्टीकरप्शनच्या अधिकार्‍यांनी तक्रारीची सहा वेळा पडताळणी केली.या प्रकरणी खात्री झाल्यानंतर २२ एप्रिल रोजी अव्वल कारकून नरेंद्र ढोले याच्यावर पुण्यातील खडक पोलीसठाण्यात  १३७/२०२४ क्रमांकाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ च्या कलम ७, ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीड लाख रुपयांची लाच मागणार्‍या अव्वल कारकुनावर गुन्हा दाखल  दीड लाख रुपयांची लाच मागणार्‍या अव्वल कारकुनावर गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ४/२५/२०२४ ०५:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".