पुणे : आदर्श प्रकाशमय सामाजिक सेवा संस्था आयोजित 'संयुक्त जयंती भीम फेस्टिव्हल २०२४' चा समारोप बुधवार,दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी झाला.संस्थापक अध्यक्ष अजय भालशंकर,उत्सवप्रमुख सचिन गजरमल,कार्याध्यक्ष स्नेहा गायकवाड, राहुल दहिरे,अनिता शिंदे, वर्षा जाधव, भारती वांजळे विष्णू शेवाळे, प्रवीण चौधरी,राहुल रिकेबी ,रवी वाघमारे,आदर्श भालशंकर,मंथन भालशंकर उपस्थित होते.
या ५ दिवसीय महोत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आ. रोहित पवार, रिपब्लिकन पक्षाचे सतीश गायकवाड,संविधान ग्रुप चे राकेश सोनावणे, डॉ.संग्राम साळवे आदि मान्यवरानी भेटी देवून महामानवांना अभिवादन केले.गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले अशा सर्व महामानवांच्या विचारांचा प्रसार या फेस्टिवल मध्ये करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.वारजे पूल येथे या फेस्टिवल चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या सर्व कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला.आयोजकांनी सर्वांचे आभार मानले .
Reviewed by ANN news network
on
४/२५/२०२४ ०२:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: