'ईशरे',पुणे चॅप्टरच्या नव्या कार्यकारिणीचे पदग्रहणपुणे : इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनीअर्स (ईशरे), पुणे चॅप्टरच्या    

 केंद्रीय कार्यकारिणीचा (सीडब्ल्यूसी) शपथग्रहण  सोहळा दि.२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता नोव्होटेल, विमाननगर, पुणे येथे झाला.  अध्यक्षपदी आशुतोष जोशी यांची २०२४-२५ या वर्षासाठी निवड करण्यात आली . आशुतोष जोशी यांच्याकडे ईशरे, पुणे शाखेचे मावळते अध्यक्ष नंदकिशोर कोतकर यांनी सूत्रे सोपवली.

नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये या क्षेत्रातील मान्यवर व्यावसायिकांचा समावेश आहे.चेतन ठाकूर(प्रेसिडेंट इलेक्ट),सुभाष खनाडे(खजिनदार) ,अमित गुलवाडे (सचिव ), नंदकिशोर कोतकर ( माजी अध्यक्ष),सुजल शाह ,विमल चावडा ,रितेश खेरा,विशाल पवार,प्रमोद वाजे,नीलेश गायकवाड,अरुण चिंचोरे,नीरज मग्नानी,कौस्तुभ वाणी,डॉ.शिकलगार नियाज दिलावर,सुबोध मुरकेवार,मानस कुलकर्णी,डॉ.अंशुल गुजराथी,शशांक मिराशी,रशिदा शब्बीर,शशिधर,सिंपल जैन,महेश मोरे,उल्हास वतपाळ,देविका मुथा,हर्षदा राणे,प्रमोद सीजी (जैन),दिलीप झा,तुळशीदास चौधरी यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये आहे. विस्तारित सामितीत आर्किटेक्ट महेश बांगड, प्रीती पुजारी,योगेश एकडे यांचा समावेश आहे.

'ईशरे',पुणे चॅप्टरचा हा ३२ वा शपथग्रहण सोहळा होता.२ एप्रिल १९९३ मध्ये पुणे चॅप्टर ची स्थापना झाली. हीटिंग, रेफ्रिजरेशन ,व्हेंटिलेशन , एअर कंडिशनिंग या क्षेत्रातील अभियंते ,व्यावसायिकांना मार्गदर्शन करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे काम ही संस्था करते. 

'ईशरे',पुणे चॅप्टरच्या नव्या कार्यकारिणीचे पदग्रहण  'ईशरे',पुणे चॅप्टरच्या नव्या कार्यकारिणीचे पदग्रहण Reviewed by ANN news network on ४/०३/२०२४ ०५:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".