उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सहभागी
विठ्ठल ममताबादे
उरण : दिनांक ८ एप्रिल रोजी बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर तालुक्यात महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचार रॅली मध्ये सहभागी होऊन उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला.
उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे परीक्षित ठाकूर तालुका अध्यक्ष, तुषार ठाकूर शहर अध्यक्ष, समत भोगले युवा अध्यक्ष यांनी सुनेत्रा पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.उरण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी रात्रंदिवस अविरत मेहनत घेत आहेत. पक्षाचा, पक्षाचे कार्य व विचारांचा तळागाळात प्रचार व प्रसार करीत आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण तालुक्याच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला.
उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सहभागी
Reviewed by ANN news network
on
४/०८/२०२४ ०९:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: