पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बी विंगमधील चौथ्या मजल्यावर तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.
या कक्षात मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि तक्रारी स्विकारण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले असून कक्षाकडे १८००२३३०१०२ आणि १९५० या टोल फ्री क्रमांक किंवा cvigilldccelection2024@gmail.com या ई-मेल पत्त्यावर तक्रार करता येईल. प्राप्त झालेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित सहायक निवडणूक अधिकारी यांना कळविण्यात येते.
कक्षाकडे दूरध्वनीद्वारे नवीन मतदान ओळखपत्र, ओळखपत्रात दुरुस्ती, मतदान यादीत नाव नोंदणी, ऑनलाइन पद्धतीने ओळखपत्र काढताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात येते, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: