विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा गावात श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. भजन, आरती, महाप्रसाद, पालखी मिरवणूक, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आदी विविध धार्मिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते.
ग्रामसुधारणा मंडळ शेवा कोळीवाडा, महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन, ग्रामस्थ हनुमान कोळीवाडा, पारंपारिक मच्छिमार सामाजिक बचाव कृती समिती, शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना या संघटनेच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा गावात श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 
श्रीराम जन्मोत्सव निमित्त आयोजित केलेल्या सर्वच कार्यक्रमांना जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसुधारणा मंडळ शेवा कोळीवाडा, महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन, ग्रामस्थ हनुमान कोळीवाडा, पारंपारिक मच्छिमार सामाजिक बचाव कृती समिती, शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना या संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
हनुमान कोळीवाडा गावात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
 Reviewed by ANN news network
        on 
        
४/१७/२०२४ ०८:५३:०० PM
 
        Rating:
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
४/१७/२०२४ ०८:५३:०० PM
 
        Rating: 
       Reviewed by ANN news network
        on 
        
४/१७/२०२४ ०८:५३:०० PM
 
        Rating:
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
४/१७/२०२४ ०८:५३:०० PM
 
        Rating: 

 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: