पुणे : पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या परिषद हॉल येथे दिनांक 17.4.2024 रोजी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागाच्या जल समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला पुणे विभागाचे सर्व शाखा अधिकारी उपस्थित होते.
पाणी उपलब्धता व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी पाणी समितीची बैठक झाली.
अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री बी.के. सिंह म्हणाले की बोर्ड स्तरावर रेल्वे/स्टेशन्स मधील पाण्याच्या उपलब्धतेवर सतत लक्ष ठेवले जात आहे व या मध्ये कोणतीही चूक होता कामा नये.
या बैठकीत वरिष्ठ विभागीय इंजिनीयर (समन्वय) श्री व्ही.के. राय, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (सामान्य) श्री पराग, वरिष्ठ विभागीय अभियंता (उत्तर) श्री मनीष के. सिंह, वरिष्ठ विभागीय अभियंता (ईशान्य) श्री मोहम्मद फैज आणि विभागीय अभियंता (दक्षिण) श्री विकास कुमार आणि पुणे विभागाच्या इंजीनियर आणि विद्युत विभागातील इंजीनियर आणि इतर निरीक्षकांनी सहभाग घेतला. बैठकीचे संचालन श्री.व्ही.के. राय यांनी केले.
रेल्वे पुणे विभागीय पाणी समितीची बैठक
Reviewed by ANN news network
on
४/१७/२०२४ ०८:५६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/१७/२०२४ ०८:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: