विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील आवरे येथील मर्दनगड किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान व मर्दनगड संवर्धन समिती आवरे तर्फे बांधण्यात आलेल्या एकविरा देवी मंदिरात चैत्र सप्तमी निमित्ताने एकविरा माता उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
उत्सवाच्या निमित्ताने आयोजक मर्दनगड संवर्धन समिती संस्थापक कौशिक ठाकुर , सरपंच निरा पाटील, राजू मुंबईकर, प्रभाकर म्हात्रे, महेश गांवड, गणेशप्रसाद गांवड, संदीप गांवड, विद्याधर गांवड, गावअध्यक्ष संजय गावड, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील,अरुण गांवड, बाळकृष्ण गांवड कृष्णा पाटील , गड संवर्धक प्रशांत भोईर या मान्यवरांच्या उपस्थितीत अभिषेक,होम ,गडपूजन, व पालखी सोहळा अश्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चैत्र सप्तमी निमित्ताने मर्दनगड किल्यावर एकविरा भक्तांचा महापूर
Reviewed by ANN news network
on
४/१७/२०२४ ०८:४८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/१७/२०२४ ०८:४८:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: