पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील तीन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याखाली कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.
सलमान रमजान शेख वय २८ वर्षे रा. साईश्रध्दा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी पुणे, सतिश ऊर्फ प्रशांत बाबुराव दातार, वय २१ वर्षे, रा. खंडोबामाळ, आंबेडकरनगर, चाकण ता. खेड जि पुणे आणि शुभम रुपसिंग भाट, वय २६ वर्षे, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगांव, पुणे अशी या सराईतांची नावे आहेत.
रमजान शेख हा पिंपरी, हिंजवडी आणि वाकड पोलीसठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.सतीश दातार हा चाकण पोलीसठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.शुभम भाट हा हिंजवडी पोलीसठाण्यच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता. संबंधित पोलीसठाण्यांनी या तिघांना एमपीडीएखाली स्थानबद्ध करण्याच्या कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला होता. त्यावर आयुक्तांनी आदेश दिले आहेत. आता या तिघांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: