दिघी पोलिसांनी दोन सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या

 



पिंपरी: पिंपरी चिंचवडमधील दिघी पोलीसठाण्याच्या पथकाने दोघा सराईत घरफोड्यांच्या मुसक्या आवळून दोन घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात यश मिळविले आहे.

अतुल चंद्रकांत अमले, वय २८ वर्षे, रा. सिध्देश्वरनगर, विश्वकर्मा मंदिराजवळ, वारजेमाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे आणि रोहित दिपक सातपुते, वय २८ वर्षे, रा. शंकरमठ, मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून घरफोडीच्या प्रकरणातील दागदागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

दिघी पोलीसठाण्यामध्ये १७६/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास दिघी पोलिसांचे पथक करत होते. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर हा गुन्हा अतुल अमले या सराईत गुन्हेगाराने केल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढून त्याला १५ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. त्याला पोलिसीखाक्या दाखविल्यानंतर त्याने आपला साथीदार रोहित सातपुते याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. चौकशीअंती या दोघांनी दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी अतुल अमले याच्यावर वेगवेगळ्या पोलीसठाण्यात ३२ गुन्हे दाखल आहेत. तर रोहित सातपुतेवर १६ गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी   पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर आयुक्त वसंत परदेशी , उपआयुक्त परिमंडळ-०३ डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त भोसरी एमआयडीसी विभाग सचिन हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीसठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक अंभोरे, हवालदार पोटे, कांबळे, जाधव, जाधव, अंमलदार काकडे, जाधव, बच्छाव यांनी केली.

दिघी पोलिसांनी दोन सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या दिघी पोलिसांनी दोन सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या Reviewed by ANN news network on ४/२१/२०२४ ०३:१४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".