भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कृती समिती

 


पुणे: भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संसदीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी पुणे शहरात नागरिक कृती समिती स्थापन करण्यात येत असल्याची माहिती सामजिक कार्यकर्ते विवेक काशीकर यांनी  पत्रकाद्वारे दिली.

भटक्या कुत्र्यांची समस्या: नागरिकांना आवाहन

रस्त्यावरच्या भटक्या बेवारशी कुत्र्यांपासून नागरिकांना होणारा त्रास, ही समस्या गेली अनेक दशके संपूर्ण देशात ठिकठिकाणी भेडसावत आली आहे.

हे कुत्रे लोकांच्या अंगावर धावून जातात, दुचाकीस्वारांचा पाठलाग करतात, ज्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार घाबरून जाऊन खाली पडल्यामुळे अपघातही होतात.  याशिवाय हे कुत्रे रात्रभर भुंकत राहून स्थानिक रहिवाशांची झोपमोड करतात. अश्या कुत्र्यांनी लोकांना, विशेषतः लहान मुलांना चावण्याच्या व ओरबाडण्याच्या लाखो घटना दरवर्षी घडतात. श्वानदंशामुळे रेबीज होऊन दरवर्षी एकट्या भारतात जवळपास वीस हजार लोकं मृत्युमुखी पडतात.

देशातील कोट्यवधी लोकांना वर्षानुवर्षे हा त्रास भोगावा लागत असूनही प्रचलित कायद्यामुळे अश्या कुत्र्यांना त्या त्या परिसरातून हटविता येत नाही. तसेच हा गंभीर प्रश्न आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी अथवा सामाजिक संघटनांनी उचलून धरलेला नाही. आणि न्यायव्यवस्थेलाही याची दखल घ्यावीशी वाटलेली नाही. 

तेव्हा या गंभीर परंतु दुर्लक्षित प्रश्नावर जागरूक व दक्ष नागरिकांनीच आवाज उठवण्याची नितांत गरज आहे.  हा प्रश्न केवळ संसदेच्या मार्गानेच सोडवला जाऊ शकतो. 

या दृष्टीने काही दक्ष नागरिकांनी एकत्र येऊन काही प्रयत्न सुरू केले आहेत.  या संदर्भात अधिक माहितीसाठी  विवेक काशीकर (भुकुम, पुणे) यांच्याशी 9011835572 या व्हाट्सएप नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कृती समिती भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कृती समिती Reviewed by ANN news network on ४/१२/२०२४ ०५:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".