पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे:-
1. पुणे-दानापूर-पुणे उन्हाळी विशेष
गाडी क्रमांक 01425 पुणे-दानापूर उन्हाळी विशेष दिनांक 25.04.2024 आणि 29.4.2024 रोजी पुण्याहून 19.55 वाजता सुटेल आणि दानापूरला तिसऱ्या दिवशी 04.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01426 दानापूर-पुणे उन्हाळी विशेष दिनांक 27.4.2024 आणि 30.4.2024 रोजी दानापूरहून 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला 17.35 वाजता पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: दोन एसी-3 टियर + 16 स्लीपर क्लास + दोन सामान्य द्वितीय श्रेणी+ दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन = एकूण 22 आयसीएफ कोचेस.
2. पुणे - ढेहर का बालाजी-पुणे उन्हाळी विशेष
गाडी क्रमांक 01433 पुणे-ढेहर का बालाजी उन्हाळी सुपर फास्ट विशेष दिनांक 24.4.2024 आणि 01.5.2024 रोजी पुण्यातून 09.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 07.45 वाजता ढेहर का बालाजी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01434 ढेहर का बालाजी- पुणे उन्हाळी सुपर फास्ट विशेष दिनांक 25.4.2024आणि 02.5.2024 रोजी ढेहर का बालाजी येथून 10.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.00 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा आणि जयपूर.
संरचना: एक फर्स्ट एसी + एक एसी-2 टियर + दोन एसी-3 टियर+ 5 स्लीपर क्लास + 6 सामान्य द्वितीय श्रेणी + 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन = एकूण 17 आयसीएफ कोचेस.
3. पुणे - कानपूर-पुणे उन्हाळी विशेष
गाडी क्रमांक 01429 पुणे- कानपूर उन्हाळी सुपर फास्ट विशेष दिनांक 23.4.2024 आणि 30.4.2024 रोजी पुण्याहून 06.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 07.10 वाजता कानपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01430 कानपूर - पुणे उन्हाळी सुपर फास्ट विशेष दिनांक 24.04.2024 आणि 01.5.2024 रोजी कानपूर वरून 08.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.05 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन आणि उरई
संरचना: तीन AC-2 टियर + 15 AC-3 टियर इकॉनॉमी आणि 2 जनरेटर कार = एकूण 20 LHB कोच.
आरक्षण: गाडी क्रमांक 01425, 01433 आणि 01429 साठी बुकिंग दिनांक 21.04.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर उघडेल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी आणि गाड्यांच्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे ते दानापूर, ढेहर का बालाजी आणि कानपूर करीता अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या
Reviewed by ANN news network
on
४/२०/२०२४ ०८:३७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/२०/२०२४ ०८:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: