जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! : पंतप्रधान मोदी

 



नांदेड,परभणी येथील जाहीर सभांत आवाहन

 

मुंबई : गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाहीत्यामुळे आता जनतेनेही काँग्रेस व इंडी आघाडीवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन करत विरोधकांवर घणाघाती हल्ले करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या महाविजय संकल्प सभांतून मराठवाडा ढवळून काढला. जनतेने मला प्रेम दिलेमाझ्यावर विश्वास टाकला,आणि मला भरभरून आशीर्वाद ही दिलेपुढील काळात देशाचा वेगवान विकास करून मी याची परतफेड करेनअशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी दिली.


'महायुतीचे नांदेडचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकरहिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकर (रासप) यांच्या प्रचार सभांमधून मराठवाड्यातील मतदारांशी संवाद साधताना श्री.मोदी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानातून 'एनडीएच्या विजयाची खात्री अधोरेखित झाल्याचा विश्वासही व्यक्त केला. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सर्वत्र 'एनडीएला  एकतर्फी मतदान झाले असून निवडणुकीआधीच पराभूत मानसिकतेत असलेल्या इंडी आघाडीकडे निवडणूक लढण्याची उमेद नाहीच आणि अनेक मतदारसंघांत उमेदवारही नाहीतअशी टीका त्यांनी केली. नांदेड येथील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजनमाजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाणखा.डॉ. अजित गोपछडे आदी उपस्थित होते. परभणी येथील सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवलेकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड आदी उपस्थित होते.


आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीतील नेत्यांचा परस्परांवर विश्वास नाही आणि देशातील जनतेवरही विश्वास नाही. देशातील 25 टक्के मतदारसंघांत या आघाडीचे पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. ज्यांचा परस्परांवर विश्वास नाहीत्यांच्यावर देशातील जनतेने विश्वास का ठेवावाअसा सवाल करूनएकमेकांविरुद्ध लढणाऱ्या या आघाडीला मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच मतदारांनी नाकारले आहेअसे श्री.मोदी म्हणाले. 4 जूनला निवडणुकीच्या निकालानंतर या आघाडीचे नेते एकमेकांच्या झिंज्या उपटतीलकपडे फाडतील असे भाकितही त्यांनी वर्तविले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही मोदी यांनी परखड टीका केली. अमेठीमधून पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी वायनाडमध्ये आलेपण तेथेही त्यांना पराभव चाखावा लागणार असून वायनाडमधील मतदान पार पडल्यानंतर पळ काढून दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहेअसे ते म्हणाले. ज्या परिवाराच्या भरवशावर काँग्रेस पक्ष चालतोत्या परिवाराचा स्वतःवरच भरवसा राहिलेला नाहीअशी खोचक टीकाही त्यांनी केली.



काँग्रेसचा गरीबांवर विश्वास नाहीत्यांनी विदर्भ मराठवाड्याच्या विकासाचा गळा घोटलात्यांच्यामुळे शेतकरी, गरीब दुबळा झालाउद्योग विकासाला खीळ बसलीलाखो तरुणांना घरदार सोडून स्थलांतर करावे लागले. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात लाखो घरांना नळाचे पाणी मिळू लागले आहे. पीक विम्याची हमी शेतकऱ्यांना मिळाली आहे,किसान सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे ओझे हलके झाले,भरड धान्याला जगभरात प्रतिष्ठा मिळवून दिल्याने मराठवाड्याच्या शेतकऱ्याला मोठे लाभ मिळणार आहेतअसेही श्री.मोदी म्हणाले.


काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात केलेल्या प्रत्येक जखमेवर आम्ही इलाज आणि उपचार करूही मोदींची गॅरंटी आहे अशी ग्वाही देऊन ,त्यांनी मराठवाडा विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारांनी केलेल्या कामांची यादीच जनतेसमोर सादर केली. गेल्या पाच वर्षांतील विकास कामे ही तर केवळ सुरुवात आहेपुढच्या पाच वर्षांत विकासाची कामे अधिक गतिमान होतीलअसेही श्री. मोदी यांनी सांगितले. 370 च्या जाचातून काश्मीरची मुक्ततातिहेरी तलाक प्रथेतून मुस्लिम महिलांची मुक्ततादेशातील कोट्यवधी महिलांचे लखपती दीदीसारख्या योजनांतून सक्षमीकरणयुवकांना रोजगाराच्या संधी ही आमची कामगिरी आहे. म्हणूनच गेल्या दहा  वर्षांत सुरू झालेल्या विकास यात्रेला बळ देण्यासाठी ‘एनडीए’ च्या उमेदवारांना विजयी करा. कारण हे उमेदवार निवडून आल्यानंतर मोदींना ताकद देणार असून विकासाला बळ देतीलअसे पंतप्रधानांनी नमूद केले. 2024 ची निवडणूक केवळ सरकार बनविण्यासाठी होणारी निवडणूक नाहीतर भारताला समृद्ध आणि विकसित बनविणे हे या निवडणुकीचे लक्ष्य आहे. देशासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस मेहनत करणार असून कोणीही कितीही अडथळे आणले तरी आता माघार नाहीदेशातील जनतेच्या डोळ्यातील स्वप्नांची पूर्तता करणे हाच आमचा संकल्प आहेअसा निर्धार ही श्री. मोदी यांनी व्यक्त केला.

जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! : पंतप्रधान मोदी जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! : पंतप्रधान मोदी Reviewed by ANN news network on ४/२०/२०२४ ०८:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".