सावंतवाडी : सिंधुदुर्गातील इन्सुली येथे २७ मार्च रोजी श्री सद्गुरू साटम महाराज मठामध्ये महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता लघुरुद्र, श्री सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिकांची भजने, रात्री ठीक १० वाजता श्री देव कलेश्वर नाट्य मंडळ नेरूर यांचा व्यंकटेश पद्मावती हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन नाटेकर कुटुंबीय व इन्सुली ग्रामस्थांनी केले आहे.
इन्सुली येथे २७ मार्च रोजी श्री साटम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: