कॅन्सर व होमिओपॅथी या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन

 



चिंचवडः स्वर्गीय फकीर भाई पानसरे शैक्षणिक संस्थेच्या लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चिंचवड यांचे वतीने 29 मार्च 2024 रोजी How to treat  cancer with homeopathy या एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.


शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी ग. दि. माडगुळकर सभागृह, निगडी येथे हे परिसंवाद होणार असून डॉ. श्रीकांत तलेरी व डॉ. राजेन शंकरन हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या दरम्यान हे परिसंवाद होणार आहे.


आजच्या स्पर्धात्मक जीवनात बदललेली व बिघडलेली जीवनशैली, पुराचा आहार व व्यायाम यांची कमतरता, तणावग्रस्त जीवन, अनुवंशिकता, अति औषधोपचार व इतर काही घटकामुळे पूर्वी दुर्मिळ असणार्‍या कॅन्सरचे प्रमाण या काही वर्षात प्रचंड वाढले आहे, या कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये विशिष्ट लक्षणावरून सकारात्मक परिणाम देणारी गुणकारी होमिओपॅथिक औषधे शोधणे तसेच त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा कशी होईल, शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन यांचे होणारे दुष्परिणाम कसे कमी करता येतील, या सर्व गोष्टींचे मार्गदर्शक या परिसंवादात वक्ते डॉ. श्रीकांत तलेरी व डॉ. राजेन शंकरन करणार आहेत. यात सर्व मार्गदर्शनपर आधारित पुस्तिका, परिसंवादा दरम्यान भेट म्हणून देण्यात येणार आहे.


या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करावा व https://forms.gle/prUzQQmY1kMAFxC76  या लिंक द्वारे आपला अर्ज सादर करावा अधिक माहितीसाठी 9822757375 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वर्गीय फकीरबाई पानसरे शैक्षणिक संस्थेचे मुख्य कार्यकारी विश्वस्त श्रीनिहाल पानसरे व्यवस्थापकीय संचालिका डॉ. झोया पानसरे प्राचार्य डॉ. नंदिनी जोशी व संयोजिका डॉ. विद्या इंडी यांच्या  मार्गदर्शनाखाली या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

कॅन्सर व होमिओपॅथी या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन कॅन्सर व होमिओपॅथी या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन Reviewed by ANN news network on ३/२३/२०२४ ०९:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".