पुणे : पुणे शहरातील चंदननगर पोलीसठाण्याच्या हद्दीत सुमारे महिन्याभरापूर्वी काही जणांनी एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना २४ तासांच्या आत अटक केली होती. तथापि यातील एक आरोपी मागील महिनाभरापासून फरार झाला होता.पोलीस त्याचा शोध घेत होते.
धीरज दिलीप सपाटे, रा. लेन नंबर १ तुकारामनगर, खराडी पुणे असे या आरोपीचे नाव आहे.
तो पिंपरी चिंचवड, धायरी, कोंढवा, अहमदनगर, बीड आदी ठिकाणी लपून रहात होता. तो पुणे परिसरात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यांनी माहिती मिळालेल्या जागी जाऊन त्याला अटक केली.
फरार आरोपीस अटक
Reviewed by ANN news network
on
३/२८/२०२४ ०८:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: