पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एका तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्या दोन लुटारूंना अटक करून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त केली आहेत.
महाळुंगे एमआयडीसी पोलीसठाण्याच्या हद्दीतील खालुंब्रे येथे २२ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रवीण देवराव भंडारवाड हा कामगार भाजी आणण्यासाठी पायी खालुंब्रे बाजारपेठेत चालला होता. पाण्याच्या टाकीजवळ आल्यानंतर त्याला दोघांनी अडविले.त्याच्याकडे असलेल्या पैशांची मागणी केली.त्याला मारहाण करून त्याच्या खिशातील दीडहजार रुपये काढून घेतले. यावेळी भंडारवाड याने आरडाओरड केल्यामुळे तेथे आजूबाजूचे लोक जमा झाले. ते त्याच्या साह्यासाठी पुढे येत असताना त्यापैकी एकाने खिशातून पिस्तूल काढून जर पुढे आलात तर प्रवीण याला ठार मारेन अशी धमकी दिली. त्यामुळे जमा झालेले लोक शांत राहिले.याचा फायदा घेत दोघेही लुटारू पसार झाले.
प्रवीण भंडारवाड याने या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली असता पोलिसांनी तपास करून निखिल नंदु बोत्रे रा. मौजे खालुंब्रे ता. खेड जि. पुणे आणि त्याचा साथीदार प्रशांत ऊर्फ बफन धर्मा लांडगे रा. खराबवाडी ता.खेड जि पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता निखिल बोत्रे याच्याकडे १ गावठी पिस्तूल, ३ काडतुसे आणि १ हजार ५०० रुपये रोख आढळून आले.दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भा.द.वि.क. ३९४, ५०६, ३४ शस्त्र अधिनियम ३ (२५), क्रिमिनल लॉ अमेटमेंन्ट ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सोो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सोो, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, श्री शिवाजी पवार सोो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, श्री राजेंद्रसिंग गौर साो, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितिन गिते, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री.संतोष कसबे, पोलीस उप निरीक्षक, किरण शिंदे, जितेंद्र गिरनार, पो.हवा. राजेंद्र कोणकेरी, अमोल बोराटे, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, युवराज बिराजदार, प्रकाश चाफळे, राजु जाधव पोना संतोष काळे, किशोर सांगळे, पवण वाजे पोकॉ/ शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, संतोष वायकर, मंगेश कदम, शेखर खराडे, अमोल वेताळ, मपोशि/ सुप्रिया शिंदे यांनी केली आहे. तसेच दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि, जितेंद्र गिरनार, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. ( नितिन गिते ) वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: