मोटारसायकलही जप्त
पुणे : अल्पवयीन मुलांना मोटारसायकल चालविण्यास देणार्या पालकांविरोधात सिंहगडरोड पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ मार्च रोजी धुळवडीनिमित्त सिंहगडरोड पोलीसठाण्याच्या हद्दीत तुकाईनगर सर्कल येथे नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी दोन अल्पवयीन मुले मोटारसायकल चालविताना पोलिसांना आढळली.
या प्रकरणी पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे यांनी सिंहगडरोड पोलीसठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून मोटार वाहन कायदा सन १९८८ चे कमल ३, ५, १९९ (अ) अन्वये दिनांक २५/०४/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दोन्ही मोटारसायकली जप्त करण्यात आली आहेत. त्या अल्पवयीन मुलांना त्यांच्या वयाच्या २५ वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मंजूर करु नये तसेच जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा परवाना एक वर्षासाठी रद्द करावा असे पत्र प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांना देण्यात आले आहे.
पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना, वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविण्यास देऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई करुन वाहने जप्त करण्यात येतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: