बनावट ताडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन जप्त; दोघे अटकेत!

 


पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाने बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणार्‍या क्लोरल हायड्रेट या रसायनाचा सुमारे २ टन साठा जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. 

प्रल्हाद रंगनाथ भंडारी, वय - ६१ वर्षे, रा- केशवनगर, मुंढवा, पुणे आणि निलेश विलास बांगर, वय ४० वर्षे, रा- पिंपळगाव खडकी, कुरकुटे मळा, मंचर जवळ ता- आंबेगाव, जि. पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे पोलिसांना हैद्राबाद येथील नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक व झोनल डायरेक्टर यांनी आरोपी निलेश बांगर हा क्लोरल हायड्रेट तयार करत असल्याची माहिती कळविली होती.

या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचार्‍यांना २३ मार्च रोजी मुंढवा परिसरामध्ये रहात असलेला प्रल्हाद भंडारी याच्याकडे या रसायनाचा साठा असल्याची माहिती मिळाली.त्याच्यावर छापा घातला असता त्याच्याकडे  १४२ किलो ७५० ग्रॅम क्लोरल हायड्रेट आढळले. त्याची चौकशी केली असता त्याने हे रसायन निलेश  बांगर याने पुरविले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने हालचाल करत बांगर याला पिंपळगाव खडकी, येथील त्याच्या घरातून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने शेती गट नं. १७७, हरीबाबावाडी, वेल्हाळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथे हे रसायन बनवत असल्याचे कबूल केले. पोलिसांनी तेथे छापा घातला असता  २ हजार २१७.५ किलो तयार क्लोरल हायड्रेट आणि ते  तयार करण्यासाठी लागणारी मशिनरी, उपकरणे व इतर साहित्य असा सुमारे ५८ लाख ४६ हजार ०४४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

ही कामगिरी  पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सह आयुक्त प्रविण पवार, अपर आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, उप आयुक्त अमोल झेंडे सहायक आयुक्त, सुनिल तांबे,  सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहायक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे,बाबर, उप निरीक्षक दिगंबर चव्हाण, सहायक फौजदार राजेंद्र कुमावत, अंमलदार अजय राणे, बाबासो कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, ओंकार कुंभार, अमेय रसाळ, सागर केकाण, तसेच अमली पदार्थ विरोधी पथक २ चे  अंमलदार संदीप जाधव, चेतन गायकवाड, युनिट ५ चे अंमलदार शिवले, कांबळे, शेख, दळवी यांनी केली आहे.

बनावट ताडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन जप्त; दोघे अटकेत! बनावट ताडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन जप्त; दोघे अटकेत! Reviewed by ANN news network on ३/२७/२०२४ ०८:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".